माजी ग्रामविकासमंत्री प्रभाकर मोरे यांच्या जयंतीनिमित्त सुंदरराव मोरे महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

More College Poladpur
पोलादपूर : 
शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे संस्थापक व महाराष्ट्राचे ग्रामविकास माजी ग्रामविकास मंत्री कै प्रभाकरजी मोरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर नुकतेच यशस्वी झाले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन विभाग यांच्या विद्यमाने आयोजित या शिबिराला महाड येथील जनकल्याण रक्तपेढी व एचडीएफसी बँक, पोलादपूर व महाड शाखा, यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी विशेष कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. संतोष काळे, सचिव अशोकबंधू देशमुख यांनी कै. प्रभाकर मोरे व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उदघाटन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. राम बरकुले व डॉ. नाथिराम राठोड, अधीक्षक मुकुंद पंदेरकर यांनी संस्थेचे विश्वस्त तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता गावडे, रक्तपेढीचे संचालक डॉ. समीर बुटाला, पीआरओ रविकांत शिंदे व अन्य सर्व स्टाफ मेंबर्सचे स्वागत केले.
यावेळी मनोगतामध्ये अध्यक्ष ऍड. संतोष काळे यांनी, स्व.प्रभाकर मोरे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा थोडक्यात आढावा घेऊन रक्तदान, वृक्षारोपण यांसारख्या विविध सामाजिक कार्यक्रमांमधून कै. प्रभाकर मोरे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची परंपरा यापुढेही महाविद्यालयाने कायम जतन करावी असे आवाहन उपस्थितांना करून रक्तदान शिबिरासाठी शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक मंगेश घुले, स्वप्नील पालांडे, भूषण म्हात्रे व संदेश सर यांन रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांना अभिनंदन पत्राचे वितरण केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी माजी विद्यार्थी, तसेच परिसरातील नागरिक, पत्रकार शैलेश पालकर व सचिन मेहता आदींनी रक्तदाता म्हणून सहभाग नोंदवलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये 35 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आल्याचे जनकल्याण रक्तपेढीतर्फे सांगण्यात आले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन विभागातील शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading