रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील उत्कृष्ठ माजी कबड्डीपटू गावच्या कामात सातत्यपूर्ण कामगिरी बजावणारे अनंत लोखंडे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी आकस्मित निधन झाल्याने लोखंडे परिवारावर दुःखाचे डोंगर तर गावासह परीसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शांत आणि मनमिळावू स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून राहणे कबड्डी खेळाची मोठी आवड शालेय जीवनशैलीसह गावाच्या मंडळातून तालुका जिल्हा स्तरावरील अनेक कबड्डी खेळाची मैदाने गाजवत खेळातून गावाचे नाव नावलौकिक केले. रोहा धाटाव एम आय डी सीतील निरलॉन कंपनीत जवळपास वीस ते पंचवीस वर्षे नोकरी करत स्वेच्छा निवृत्ती घेतली तद्नंतर वडिलांच्या वडिलोपार्जित शेतीत लक्ष वेधून शेतात विविध पीक त्याच बरोबर विविध जोड व्यवसाय करत मुलांना उत्तमरीत्या चांगले शिक्षण दिले. तसेच गावचे खजिनदार खजिनदार म्हणून अनेक वर्ष उत्तमरीत्या सांभलले तसेच ते ट्रान्सवल्ड कंपनीत कॅन्टीन खानावळच्या माध्यमातुन कामगारांना सेवा देत असत असे अनंत लोखंडे यांचे आकस्मित निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अनंत लोखंडे यांच्या निधनाची वार्ता समजताच रोहा तालुक्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा,तसेच विविध क्षेत्रातील दुःखी समाज बांधव त्यांच्या अंतीम विधीत सहभागी होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.तसेच त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, पुतणे, सूना, भावजय, असा मोठा लोखंडे परिवार असून त्यांचे दशक्रिया विधी रविवारी २९ सप्टेंबर रोजी तर उत्तर कार्य मंगळवारी १ ऑक्टो.रोजी त्यांच्या राहत्या घरी मौजे चिल्हे येथे संपन्न होत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.