मांडवा येथील प्राथमिक शाळेचं आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन

Mahendra Dalvi
सोगाव (अब्दुल सोगावकर) :
आपल्या गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देणारे हात भरपूर आहेत पण आपल्याला मागता आले पाहिजे. आज दी लाइफ फाउंडेशनने सीएसआर फंडातून मांडवा राजिप शाळेचा ‘द लाइफ स्कुल’ प्रकल्पाअंतर्गत केलेला कायापालट खूपच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी गुरुवार दि. १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता मांडवा येथील नूतनीकरण केलेल्या रायगड जिल्हा परिषदे प्राथमिक शाळेच्या उद्घाटन प्रसंगी काढले. या नूतनीकरण केलेल्या शाळेचे मोठ्या थाटात व वाजतगाजत उद्घाटन करण्यात आले.
आमदार महेंद्र दळवी यांनी अधिक बोलताना सांगितले की, दी लाइफ फाउंडेशन चे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आदी सामाजिक कार्यासह वंचित आदिवासी समाज घटकांसाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केलेले कार्य खूप चांगले आणि कौतुकास्पद आहे. त्यांनी या राजिप मांडवे शाळेचा असा केलेला कायापालट मी पहिल्यांदाच पाहत आहे, त्यांनी त्यांच्या टीम च्या माध्यमातून अलिबागचा तालुक्याचा पहिला गाव जेथून सुरुवात होते त्या गावात अविश्वनिय अशी शाळा नूतनीकरण केली आहे, असे सांगत नूतनीकरण केलेल्या दी लाइफ फाउंडेशन संस्थेचे व त्यांना योग्य ते सहकार्य करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचेही कौतुक केले.
या कार्यक्रमाला अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह दी लाइफ फाउंडेशनच्या सहसंस्थापक पूनम लालवानी, विश्वस्त अजित लालवानी, सुहेल लालवानी, राजिप प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, सोनाली बुलचंदानी, लमिया लालवानी, ज्येष्ठ नागरिक तोडणकर गुरुजी, ग्रामपंचायत धोकवडे प्रशासक हेमलता वाडेकर, ग्रामसेवक धोकवडे अंकुश शेळके, मंडळ अधिकारी नलिनी पाटील, तलाठी सजा धोकवडे संदीप ढमढेरे, कनिष्ठ अभियंता महावितरण मांडवा प्रियंका वसावे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, प्रशांत गावंड, महेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दिपाली लोहार, मुख्याध्यापक विश्वास पाटील, शिक्षक नितीन वाकडे, केसरीनाथ पाटील, जयश्री वाकडे, यांच्यासह मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई, दी लाइफ फाउंडेशन चे पदाधिकारी हरदीप भामरा, विनोद लाला व प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे आणि कार्यकर्ते प्रणय ओव्हाळ, राखी राणे, मांडवा पंचक्रोशीतील महिला व पुरुष मान्यवर व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी तसेच विद्यमान विद्यार्थी व त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे महिलांनी औक्षण केले, तद्नंतर आमदार महेंद्र दळवी व दी लाइफ फाउंडेशनच्या सहसंस्थापक पूनम ललवाणी मॅडम यांच्या हस्ते शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे फित कापून मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने आपली पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश मूर्ती व सरस्वती देवीचे पूजन करत दीपप्रज्वलन करण्यात आले. यासोबतच आमदार महेंद्र दळवी यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या सर्व वर्गखोल्यांचे, हॉल, संगणक कक्ष, स्टाफरूमचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे शाळा व्यवस्थापन समितीतर्फे पुष्परोप देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर स्फूर्ती गीत व पारंपरिक कोळीगीतावर नृत्य सादर करून उपस्थित सर्वांची मने जिंकली. दी लाइफ फाउंडेशन प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे यांनी दी लाइफ फाउंडेशन बाबतीत मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दी लाइफ फाउंडेशन हि संस्था स्थापन होऊन दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत, अलिबाग तालुका व परिसरात सन २०२० पासून संस्था सामाजिक कार्यात आपले उल्लेखनीय योगदान देत आहे. संस्थेने आतापर्यंत केलेल्या व पुढील करत असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य याविषयीच्या कार्याची महत्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.
यानंतर दी लाइफ फाउंडेशनच्या सहसंस्थापक पूनम ललवाणी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, मी अलिबागमध्ये पण राहते व मुंबई मध्ये पण राहते, मला माझ्या गावाबद्दल खूप प्रेम आहे, गेल्या काही वर्षांपासून आमचे स्वप्न होते की, माझ्या गावातील शाळेला एक मॉडेल शाळा(स्कुल) बनवायचे आहे, म्हणून मी हि शाळा निवडली व सहा महिन्यात नूतनीकरण पूर्ण करत ते आमचे स्वप्न आज साकार झाले आहे.
या शाळेची भिंत सोडून आम्ही सर्व गोष्टींची नवीन पद्धतीने बांधणी केली आहे, यामध्ये उत्कृष्ट वर्ग खोल्या व मुलांना बसण्यासाठी आधुनिक बैठक व्यवस्था, प्रशस्त सभागृह, प्रशस्त संगणक कक्ष, स्टाफरूम, कार्यालय, स्वयंपाकघर, आधुनिक पद्धतीचे शौचालय, गार्डन आदी नाविन्यपूर्ण सर्व सुखसुविधा उपलब्ध केल्या आहेत. या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षणासोबत त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे शिक्षण, संगणक शिक्षण, योगा शिक्षण द्यायचे आहे, तसेच त्यांना बाहेरच्या जगाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास दौरा घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून भविष्यात पुढे जाऊन तो विद्यार्थी वा विद्यार्थिनी अलिबागमधील या मांडवे शाळेतून शिकून जिल्हाधिकारी पदावर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच हि शाळा नूतनीकरण करण्यामागचा हेतू व भूमिका स्पष्ट केली. या शाळेला अंदाजे ४५ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आल्याचे संस्थेच्या सहसंस्थापक पूनम ललवाणी यांनी शेवटी सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे स्फूर्ती गीत व नृत्य सादर केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी रोख पारितोषिक दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading