PEN न्यूज ऑनलाइन टीम :
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य देण्यात येते. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. 8 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हफ्ते एकत्र मिळणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली.
अपात्र महिलांची संख्या वाढली
फेब्रुवारी महिन्यात योजनेच्या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास 2 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले, त्यामुळे त्यांचा फेब्रुवारीचा हफ्ता रोखला गेला. यामुळे सरकारवर जोरदार टीका झाली होती.
महिला दिनासाठी सरकारचा मोठा निर्णय
महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने हा रखडलेला हफ्ता 8 मार्च रोजी देण्याचा निर्णय घेतला. तसेच, मार्च महिन्याचा हफ्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी वितरित केला जाणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.
महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर
या योजनेसंदर्भातली यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महिलांनी एकत्र येऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहनही अदिती तटकरे यांनी केले.