नजीकच्या काळामध्ये माथेरान मधील सात विद्युत रोहितरांचे मेंटेनन्स चे काम पूर्ण केलेले आहे तसेच दोन बंद रोहित्रे दुरुस्त करून चालू करण्यात आल्याने काही भागातील कमी वीज दाबाचा प्रश्न मार्गी काढण्यात आलेला असल्याची माहिती दिली भूमिगत लघुदाब विद्युत वाहिणीचे दहा ठिकाणी व उच्च दाब वहिनीच्या 8 ठिकाणी जोड देऊन विद्युत वाहिन्या चालू केलेले आहे, त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला आहे.
माथेरान शहरातील जुने धोकादायक बाजूला काढण्यात आले असून त्यामुळे बाजारपेठेतील बकाल पणा कमी होण्यास मदत झाली आहे. 15 ठिकाणचे खराब झालेले डिस्ट्रीब्यूशन बॉक्स बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने तेही कामे लवकरच पूर्ण केली जात आहेत अशी ही माहिती दिली त्याचप्रमाणे नेरळ माथेरान घाट मार्गामध्ये पावसाळ्यामध्ये झाडांमुळे येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे 15 मे पर्यंत झाडे छाटण्याची कामही पूर्ण केली जातील अशी ही माहिती यावेळी दिली गेली ज्यामुळे आंदोलन कर्त्यांचे समाधान झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी माथेरान मनसे शाखेचे अध्यक्ष संतोष कदम, भूषण सातपुते, सूरज कळंबे, वृषिकेश् केळगणे, असीफ खान, रजनी कदम, शिवाजी सुतार आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.