महवितरणचा भोंगळ कारभार ! मृदगंधार सोसायटीला पूर्व कल्पना न देता बसवले प्रिपेड मीटर

Mseb Nivedan
पेण : 
मृदगंधार सोसायटीच्या मध्ये कोणत्याही प्रकारची सूचना न देता खाजगी कंपनीचे कर्मचारी येऊन सोसायटीचे मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर लावले जात आहेत कर्मचारी काम करण्यासाठी येत असतील तर त्यांनी आदेश घेऊन सोसायटीमध्ये प्रवेश करावा या बाबतचे निवेदन नुकतेच महावितरण कंपनीचे साहाय्यक अभियंता संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
सोसायटीमध्ये येऊन सोसायटीला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता, तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा आदेश नसताना सोसायटीमधील हेमश्री व बागेश्री बिल्डिंग मधील अनेक मीटर बदलवले, विरोध केला असता ते निघून गेले परंतु नंतर पुन्हा येऊन मीटर बदलवत आहेत , हे असे छुपे काम करण्याची कोणती पद्धत आहे? कोणत्याही प्रकारचे चालू मीटर ग्राहकाला न कळवता बदलणे योग्य आहे का? आम्ही त्यांना मिळालेली ऑर्डर मागितली किंवा मृदगंधार सोसायटीचे मीटर बदलण्याचे त्यांच्याकडे काही पत्र आहे का असे विचारले असता सदर कर्मचारी आमच्या सभासदांशी उडवाउडवीची उतरे देण्यात आली.
तसेच कर्मचाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे लेखी आदेश नव्हते तसेच त्यांच्या कंपनीचे ID कार्ड देखील नव्हते घातलेले, तसेच आमच्या सोसायटीच्या एन्ट्री रजिस्टर मध्ये देखील त्यांनी अर्धवट माहिती भरली होती, असे कोणीही व्यक्ती येऊन डायरेक्ट मीटर ला हात लावणार असतील आणि त्यामुळे काही अनुचित प्रकार घडला किंवा मीटर बदलायच्या नावाखाली कोणी अनोळखी व्यक्ती येऊन काही अनुचित प्रकार केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश उपस्थित होत आहेत त्यामुळे महावितरण कंपनीने काम करताना आमच्या सोसायटीची पूर्व परवानगी घ्यावी तसेच जे माणसे येणार असतील त्यांच्याकडे लेखी आदेश व उचित कागदपत्र असल्याशिवाय सोसायटी मध्ये कोणतेही काम करण्यास सक्त मनाई असेल याची नोंद घ्यावी असे निवेदन ग्रामीण सहाय्यक अभियंता याना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading