महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला वाशी विभागात उदंड प्रतिसाद

Atul Mhatre Jansanvad Yaatra
PEN न्यूज ऑनलाइन टीम :   
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या वाशी विभागातील जन आशीर्वाद यात्रेला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी ग्रामस्थ त्यांचे स्वागत करीत आहेत. ग्रामस्थांच्या वाढता प्रतिसाद पाहता अतुल म्हात्रे यांचा विजय निश्चित आहे. विधानसभेत भरघोस मतांनी अतुल म्हात्रे यांना निवडून देण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहे अशी ग्वाही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांनी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 वाशी खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येथील निवडून आलेले लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष सोडवू शकले नाहीत. ग्रामस्थांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच खारेपाटातील जनता त्यांना घरी बसवतील. निवडून आल्यावर वाशी खारेपाटातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही यावेळी अतुल म्हात्रे यांनी दिली. 
 जेएसडब्ल्यू स्टील सारखी मोठी कंपनी पेण तालुक्यात असताना देखील या कंपनीत परप्रांतीची भरती होते येथील स्थानिक युवकांना नवी मुंबईत नोकरी साठी जावे लागते. शेकडो युवा बेरोजगार आहेत. युवकांच्या हातांना रोजगार मिळायला पाहिजे एमआयडीसी, एमएमआरडीए,  अलिबाग मुंबई कॉरिडॉर, मेट्रो प्रोजेक्ट यासारखे प्रोजेक्ट राबविताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे त्यांना या प्रोजेक्टमध्ये भागीदार म्हणून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांचा व स्थानिकांचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी आपण काम करणार असल्याचे अतुल म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
 या जन आशीर्वाद यात्रेत पेण तालुका कॉग्रेस अध्यक्ष अशोक मोकल,  नंदकुमार म्हात्रे, रामशेठ घरत, सूर्यकांत पाटील, वैभव म्हात्रे, शेखर शेळके, इदुल्ला कुवारे, देवेंद्र म्हात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading