मुंबई (मिलिंद माने) :
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी गठित केलेल्या विविध समित्यांचे एकत्रित उद्घाटन सोहळा बुधवार, १४ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. विधानभवन, मुंबई येथील चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात संपन्न होणार आहे.
या विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन व मनोगत होणार आहे.
२३ एप्रिल २०२५ रोजी शासनाने जाहीर केलेल्या विधानसभेतील आणि विधान परिषदेतील समित्यांची संख्या ५० पेक्षा अधिक असून त्यामध्ये अंदाज, लोकनेता, पंचायतराज, रोजगार हमी, अनुसूचित जाती-जमाती, महिला व बालकल्याण, अल्पसंख्याक, ग्रंथालय, पर्यावरणीय बदल, नियम, वेतन-भत्ते आदी समित्यांचा समावेश आहे.
प्रमुख समित्यांचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे (महाराष्ट्र विधानसभा):
-
अर्जुन खोतकर – अंदाज समिती
-
विजय वडेट्टीवार – लोकनेता समिती
-
राहुल कुल – सार्वजनिक उपक्रम समिती
-
संतोष दानवे – पंचायतराज समिती
-
सुनील शेळके – रोजगार हमी योजना समिती
-
सुहास कांदे, मोनिका राजळे, किशन कथोरे, आशुतोष काळे, रवी राणा, डॉ. किरण लहाने, अजित पवार आदी अनेक सदस्य महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख आहेत.
विधान परिषदेतील समित्यांमध्येही श्रीकांत भारतीय, कृपाल तुमाने, निरंजन डावखरे, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. नीलम गोरे, प्रा. राम शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
विशेष समित्या:
-
एड्स प्रतिबंधक चर्चा पीठ (FoRUM)
-
धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समिती
-
वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त तदर्थ समिती – या समित्यांमध्ये विधिमंडळातील वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.