महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण च्या वतीनं भरविण्यात आलेल्या भव्यदिव्य क्रिकेट सामन्यांची यशस्वी सांगता

Pen Patrakar Cricket Goregav
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी एक दिवसीय भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर करण्यात आले होते. या सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेळीमेळीच्या आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सामने खेळवण्यात आले.
रंगतदार अंतिम सामना आणि गोरेगाव प्रेस क्लबचा दिमाखदार विजय
या स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा आणि गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात रंगला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर गोरेगाव संघाला ६ धावांची आवश्यकता होती. अशा निर्णायक क्षणी गोरेगाव संघाच्या खेळाडूने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Pen Patrakar Cricket Roha Sangh
मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन
सकाळी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे, समीर वारे (अकोला), पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, ॲड. मंगेश नेने, वनविभाग अधिकारी कुलदीप पाटकर, नंदेश पाटील, राजुशेठ पिचिका, मुदस्सीर अखवारे, दत्ता कांबळे, आर.टी.ओ. अधिकारी महेश देवकाते, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, प्रवीण पाटील, महावितरणचे अधिकारी श्री. मेश्राम, हरीश बेकावडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेण अध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष विनायक पाटील, सचिव स्वप्निल पाटील, सहसचिव सुदर्शन शेळके, खजिनदार किरण बांधणकर, सल्लागार दीपक लोके, सहसल्लागार गणेश पाटील, सदस्य रुपेश गोडिवले, मितेश जाधव, प्रशांत पोतदार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीफळ वाढवून आणि सामन्याचे उदघाटन करण्यात आले.
सामाजिक आणि शासकीय अधिकारी यांच्यात मैत्रीपूर्ण सामने
या स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे पेण पोलीस विरुद्ध महावितरण पेण संघ तसेच सामाजिक आणि राजकीय मंडळी विरुद्ध प्रांत, तहसील, वनविभाग कर्मचारी यांच्यात खेळवलेले मैत्रीपूर्ण सामने. या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले.
सामन्याचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटप्रेमींची मोठी उपस्थिती
या स्पर्धेत पनवेल, खारघर, अलिबाग, नागोठणे, गोरेगाव, खालापूर, रोहा, पेण या भागातील पत्रकारांनी सहभाग घेतला. तसेच जे.एस.डब्ल्यूचे अधिकारी आत्माराम बेटकेकर, रायगड जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, बाफना ज्वेलर्सचे विशाल बाफना यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि क्रिकेटप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेतला.
Pen Patrakar Cricket Pen Sangh
विजेत्या संघाचा गौरव
अंतिम विजयी संघ गोरेगाव प्रेस क्लबला रायगड जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांनी पेण पत्रकार संघाने केलेल्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या स्पर्धा केवळ खेळासाठी नाहीत तर सामाजिक एकजूट आणि पत्रकार बांधवांमध्ये मैत्री दृढ करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. भविष्यातही अशा उपक्रमांसाठी सर्वांनी एकत्र यावे.”
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण शाखेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतल्यानेच हा उपक्रम यशस्वी झाला. संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने क्रिकेट स्पर्धा अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading