महाराष्ट्र दिनानिमित्त पणजी येथे गुरूवार, दि. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्रदिन सोहळयाप्रसंगी ‘महाराष्ट्र मंडळ गोवा’ ला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय कुडाळकर यांनी येथे दिली. पोलादपूर येथील मुळगांव कोंढवी रोहिदासनगर येथे वास्तव्यास आले असता कुडाळकर यांनी महाराष्ट्रदिन सोहळयाची माहिती दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री ना.श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशतर्फे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ उपक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व ‘महाराष्ट्र मंडळ गोवा’ संघटनेला अगत्याचे निमंत्रण करण्यात आल्याची माहिती देताना विजय कुडाळकर यांनी पणजी येथील इन्स्टीटयूट मिनेझीस ब्रिगांझा हॉल, पणजी, गोवा राज्य येथे महाराष्ट्र राज्य दिवस दि. 1 मे 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत साजरा करण्यात येणार असून त्यानंतर जेवण आणि औपचारिक गप्पागोष्टी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
गोवा राज्यातील महाराष्ट्रातील बंधूभगिनींनी याप्रसंगी मोठया संख्येने आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहून महाराष्ट्र राज्य दिवस मोठया जल्लोषात साजरा करु या असे आवाहन विजय कुडाळकर यांनी केले असून महिलांनी नऊवारी साडी व पुरूषांनी कुर्ता-पायजमा अशा मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मराठी पोषाखात यावे,अशी विनंती करून महाराष्ट्र मंडळ गोवा तर्फे सर्व बंधूभगिनींना सर्वांसाठी मानाचा फेटा बांधण्यात येणार आहे, असे आवर्जून सांगितले. सर्वांनी महाराष्ट्र मंडळ गोवाकडे उपस्थित राहणार असल्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे यावेळी अध्यक्ष कुडाळकर यांनी सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.