विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार 29 एप्रिल रोजी सायंकाळी 04.00 वाजता महाराष्ट्र गौरव यात्रेचे रोहा तालुक्यातील वाकण नाका येथे फटाक्यांच्या आताषबाजीत स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, कोंकण विभाग महाराष्ट्र गौरव रथयात्रेची सुरुवात रविवार 27 एप्रिल रोजी कसबा संगमेश्वर (छ. संभाजी महाराज स्मारक) येथुन सकाळी 09.00 वा. करण्यात आली. सदरील यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रमुख व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तु व ठिकाणांचे पावित्र्य जपत छत्रपती शिवरायांच्या पावन रायगड जिल्हाच्या भुमीत मंगळवार 29 एप्रिल रोजी आली असता कोलाड येथे या गौरव रथयात्रेत रोहा तालुक्याची जिवनदायीनी असलेल्या पवित्र कुंडलिका नदीचे जल तसेच ग्रामदैवत श्री धाविर महाराज मंदिर व स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री स्व.सी.डी.देशमुख, स्व. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्मृती स्थळांची मृत्तिका व घोसाळगड, अवचितगड येथील ऐतिहासिक नजराणे या गौरव रथयात्रेत अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदरील रथयात्रेचे वाकण नाका येथे शिवराम शिंदे, दिलीप टके, हरिष काळे,संतोष कोळी,बाळा टके, सचिन कळसकर, अतुल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांच्या आताषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी आशा शिर्के,अमिता शिंदे,सुजाता जवके,पूनम काळे,सुनीता तटकरे,जुगन जैन, बिपीन सोष्टे,श्रीकांत रावकर, दिपेंद्र आवाद,प्रभाकर ठाकुर,चेतन टके, रोशन पारंगे, गोरख पारंगे तसेच रोहा येथील मयुर दिवेकर,गोरख पारंगे, महेश कोल्हटकर, समाधान शिंदे, महेश नागावकर यांच्यासह विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहा. पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.