दिल्लीतील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पुन्हा एकादा आजपासून राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. निकाल लागून पाच दिवस झाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालांनी वेग घेतला नव्हता. त्यामुळे महायुतीचे नवनिर्विचत बहुतांश आमदार हे जिल्ह्यात परतले होते. आता दिल्लीतील बैठकीनंतर भाजपाच्या आमदारांची व नंतर महायुतीच्या आमदारांची बैठक होण्याची शक्यता असल्याने सर्वांच्याच नजरा आता मुंबईकडे लागल्या आहेत. एकंदरीत निकाल पहाता महायुतीत चैतन्याचे वातावरण असून, महाविकास आघाडीमध्ये पराभवावर आत्मचिंतन करण्यात येत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
प्रसंगी जिल्ह्यातील महायुतीचे आमदार हे आता मुंबईच्या दिशेने कूच करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महायुतीमधील उद्धवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी तीन दिवसापूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांचे आता आत्मचिंतन सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुतीने जिल्ह्यातील सातपैकी सात जागा घेत गेल्यावेळचे आपले रेकॉर्ड कायम ठेवलं. रायगड जिह्यातील उरण आणि कर्जत खालापूर येथील महायुतीचे उमेदवार हे दहा हजारपेक्षा कमी मतांनी विजयी झाले तर उर्वरित पनवेल,पेण,अलिबाग, महाड, श्रीवर्धन येथील महायुतीचे उमेदवार हे वीस हजार हुन अधिक मतांनी विजय संपादन केले आहे.त्यामुळे सध्या नवचैतन्य आहे.
महायुतीमधील पाच नवनिर्वाचित आमदार सध्या नव्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी फिल्डींग लावत आहेत. प्रामुख्याने यंदाच्या मंत्रिमंडळात एकाच वेळी दोन आमदाराची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचे महायुतीच्या सूत्रांकडून संकेत देण्यात आले आहे. त्याचे चित्रही येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल, जिल्ह्याला दोन कॅबिनेटमंत्रीपद जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे
————————————————– पराभूतांकडून बुथनिहाय आकडेमोड महविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा जिल्ह्यात साफ झाला. महा विकास आघाडी मधील उद्धवसेना सहित शेकापला रायगड जिल्ह्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहेत . परंतू आता ‘मविआतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बुथनिहाय मतदानाचा अभ्यास करत कोठे गणित चुकेल याचा शोध सुरू केला आहे. ज्यांना उमेदवारी मिळली नव्हती तेही अभ्यास करून आपण कसे सरस ठरलो असतो ते सांगत आहेत. ————————————————–
महायुतीत इनकमिंग वाढण्याची शक्यता, जिल्ह्यात महायुतीने एकतर्फी विजय मिळविल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. दरम्यान, आता काँग्रेसमधून आणखी एका नेत्याचे महायुतीत अजित पवार गटात इनकमींग होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड जिल्ह्याच्या राजधानीतून हे होण्याचे संकेत आहे; परंतू ज्या नेत्याविषयी याबाबत चर्चा आहे. त्या नेत्याने या चर्चेचे स्पष्ट शब्दात खंडन केले आहे. परंतू अनिश्चितेतच्या राजकारणाच्या खेळात वेळेवर काहीही अनपेक्षीत घडू शकते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.