महादेववाडी येथे रामनवमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण

Maharaj
कोलाड (श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील महादेववाडी कोलाड येथे रामनवमी निमित्ताने बुधवार दि.१७/४/२०२४ चैत्र शुद्ध नवमी पासुन शनिवार दि.२०/४/२०२४ पर्यंत गुरुवर्य वै.ह.भ.प.आलिबागकर महाराज,वै ह. भ.प.गोपाळ महाराज वाजे (पंढरपूर )गुरुवर्य वै.ह.भ.प.धोंडू महाराज कोल्हाटकर (पंढरपूर )वै.ह.भ.प.सिताराम दाजी खामकर महाराज (महादेववाडी )वै.ह.भ.प.बाबु महाराज बाईत (महादेववाडी )वै. ह.भ.प.श्रीधर महाराज बाईत (भागाड )यांच्या कृपाआशिर्वादामुळे अखंड नाम यज्ञ सोहळा ह.भ. प. नारायण महाराज वाजे (मठाधिपती पंढरपूर )यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.
यारे यारे लहानथोर l याती भलती नारी नर l करावा विचार l न लगे चिंता कोणाची l
या ओवी प्रमाणे दररोज सकाळी पहाटे ४ ते ६ काकड्याचे भजन, सकाळी ८.३० ते ते १२.३० व सायंकाळी ३ ते ५ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण,सायंकाळी ६.३० ते ७.३०हरिपाठ रात्री ९ ते ११हरिकीर्तन होईल.
बुधवार दि.१७/४/२०२३ रोजी सकाळी ९ते ११ वा.ह. भ. प. बबन महाराज वांजळे (नारायणगाव )यांचे किर्तन रात्री ९ ते ११ ह.भ.प.नित्यानंद महाराज मांडवकर यांचे किर्तन,गुरुवार दि.१८/४/२०२४ रोजी रात्री ९ ते ११ वा. ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी )यांचे किर्तन. शुक्रवार दि.१९/४/२०२४ रात्री ९ ते ११ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील (धाटाव )यांचे किर्तन,शनिवार दि.२०/४/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ वा.विजयानंद महाराज तेलंगे यांचे काल्याचे किर्तन होणार असून सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी अध्यक्ष नथुराम बाईत, उपाध्यक्ष धोंडू चितळकर,सेक्रेटरी चंद्रकांत भऊर,खजिनदार शांताराम बाईत,हिशोब तपासणीस पांडुरंग बाईत,तसेच ग्रामस्थ मंडळ,श्रीराम मित्रमंडळ,नवतरुण युवक मंडळ,महिला मंडळ महादेववाडी (कोलाड )मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading