महाड शहरसह २२ गावांवर पाणी संकट, कोतुर्डे धरणाने तळ गाठला

Mahad Dam
महाड ( मिलिंद माने ) :
महाड शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तसेच परिसरातील २२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कोतुर्डे धरणातील पाणीसाठा चालू वर्षी कमी पर्जन्यमापन झाल्याने . धरणात केवळ दहा ते बारा टक्के पाणीसाठा असल्याने महाड शहर आणि २२ गावांना पाणीटंचाई एप्रिल महिन्यापासूनच जाणवणार आहेत.
महाड शहरासह तालुक्यातील २२ गावा कोतुर्डे धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. यंदा धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच या धरणाच्या पाण्याची पातळी घटली होती या धरणात फक्त दहा ते बारा टक्के पाणीसाठा सध्याच्या घडीला असल्याने महाड शहर आणि परिसरातील २२ गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरा साठी इतर काही पाण्याचे सोर्स असले तरी मात्र २२ गाव हे या धरणातील पाण्यावरच अवलंबून असतात त्या मुळे या गावांना एप्रिल महिन्या पासूनच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
महाड शहराला प्रामुख्याने कोतुर्डे धरणातून पाणीपुर वठा होतो. याशिवाय कुर्ले धरण व एम.आय. डी.सी. येथूनही काही प्रमाणात शहरातील पुर्वेकडील व उत्तरेकडील भागात पाणी पुरवठा होतो. या चारही ठिकाणाहून दररोज ४० लाख लिटर्स पाणी नगरपा लिका शहराला पुरविते. कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी छ.शिवाजी चौकातील मोठ्या टाकीत आणण्यात .येते तेथून बहुतांशी भागाला पाणीपुरवठा केला जातो.
कोतुर्डे धरणातील पाण्यावर महाड शहरा प्रमाणे या परिसरातील केंबुर्ली, दासगाव, वहूर, मोहोप्रे, गांधारपा ले, लाडवली, नाते, खर्डी, चापगाव, तळोशी, नांदगाव खु, नांदगाव बु, करंजखोल, तेटघर, कोकरे, आचलोळी, इत्यादी गावांना देखील पाणीपुरवठा केला जातो. यंदा या धरणाच्या पाण्याची पातळी खालाव ल्या मुळे या २२ गावांना पाणीटंचाईची झळ. जाणव णार असल्या ने त्यांना देखील टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रशासनाला करावा लागणार आहे. यंदा पावसाचे पर्जन्यमापन कमी झाल्याने तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात झाल्याने धरणा माधील पाणी कमी झाला.
महाड शहरातील पाणीपुरवठा करताना नगर पालिकेला कोथुर्डे धरणातून मागील वर्षी पंप लावून पाणीउपसा करावा लागत होता मागील वर्षी. ५ मे पासून धरणातील कमी पाणी साठ्याला पंप लावून उपसा करून यातील पाणी नगरपालिका शहरात पुरवत होती. मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा दहा ते बारा टक्क्यावर आल्याने पाऊस सुरु होईपर्यंत सद्य परिस्थिती एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे महानगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी याबाबतचे नागरिकांना आवाहन केले आहे त्यासाठी त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात कोणकोणत्या वेळेला पाणीपुरवठा केला जाईल यासाठी त्यांनी कोष्टक तयार केले आहे.
महाड शहराला एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने महाडकारांनी पिण्याचे पाणी जपून वापरण्याची गरज आहे प्रत्येक नागरिकांना वापरालाही मोठ्या प्रमाणाच पाणी लागत असल्याने काही नागरिकांना शहरातील विंधनविहिरीचा वापर करावा लागणार आहे.तर मोठ्या इमारतीमध्ये पाण्याचा टँकर विकत मागवावा लागणार आहे. महाड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. रहिवासी इमारती व व्यापारी पाणी वापर वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याची गरज भागत नसल्याने नागरिकां ना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पूरामुळे तर उन्हाळ्यात टंचाईमुळे महाडकरांना पाणीपाणी करावे लागत आहे.
महाड शहरात कोथूर्डे, midc रानबाजीरे, कुर्ला या धरणातून पाणीपुरवठा होतो. कुर्ला धरणातून दादली येथे आणलेले पाणी प्रक्रिया करून शहरात आणले जाते. अशाच पद्धतीने कोथूर्डे धरणातून देखील आणलेले पाणी प्रक्रिया करून पुरवठा केला जातो. शहरात जवळपास २५००० नळ जोडणी आहेत. कोथूर्डे वगळता कुर्ला धरणात अद्याप पाणी साठा बऱ्यापैकी असून शहरात पाणी पुरवठा करताना सर्वाना पाणी पुरेल अशा पद्धतीने नियोजन केल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर यांनी सांगितले. नागरिकांनी देखील पाण्याचा योग्य आणि गरजेपुरता वापर करावा असे आवाहन पालिकेमार्फत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading