महाड शहरावर शोककळा: टोइंग व्हॅनच्या धडकेत चार तरुणांचा मृत्यू , दोघे गंभीर जखमी

Mahad Accident
महाड ( मिलिंद माने ) : 
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६ वर मध्यरात्री १२.३० च्या सुमारास वीर रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाला यामध्ये चौघांचा मृत्यू तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वीर रेल्वे स्टेशन जवळील टोइंग व्हॅन (MH14CM309) ने दिलेल्या धडकेत स्कार्पिओ (MH 06BE 4041) मधील सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड, साहिल नथुराम शेलार(25वर्षे) आणि प्रसाद रघुनाथ नातेकर(25वर्षे) दोघेही राहणार कुंभारआळी महाड या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे (35 वर्षे) रा. तासगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि सुरज अशोक नलावडे(34वर्षे) राहणार चांभारखिंड महाड या दोन जखमींना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले आहे तर शुभम राजेंद्र मातळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
Mahad Accident1
हे सहाजण महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओने जात असताना रात्री 12:30 चे सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलावर उभी असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोइंग व्हॅन ने स्कॉर्पिओला पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाणपूलालगतच्या सर्विसरोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली.
अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी टोइंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
Mahad Accident2
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६ वरील वीर गावाजवळ टोविंग व्हॅन ने दिलेल्या धडकेत महाड मधील स्कार्पिओ मधील चार जण मृत्युमुखी पडल्याने महाडवर शोक कळा पसरली अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पोलीस व परिवहन विभाग काय दक्षता घेणार असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading