महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या वतीने पदाधिकारी शिष्टमंडळाने बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
या दरम्यान महाड व पोलादपूर विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.
यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. भोसले यांनी दिले.
या वेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमित शिंदे, दक्षिण रायगड जिल्हा सचिव शेखर सावंत व उपजिल्हाध्यक्ष विकास आंबेकर उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.