महाड विधानसभा मतदार संघातील 2024 निवडणुकीची सुसज्जता; मतदान केंद्र, मतदार आणि प्रशासनाची तयारी

Mahad Map
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
2009 साली पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या महाड विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव तालुक्यातील काही गावांचा समावेश झाला आणि त्यानंतर निर्णायक मतदार पोलादपूर तालुक्यातील की माणगांव तालुक्यातील अशी चुरशीची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, या पुनर्रचनेनंतर पोलादपूर तालुक्यातील मतदारांचे निर्णायक वर्चस्व कमी होऊन माणगाव तालुक्यातील वाढलेल्या मतदारांवर उमेदवारांच्या विजयाची भिस्त असल्याचे चित्र मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आहे.
दरम्यान, या 194-महाड मतदार संघातील विधानसभा निवडणूक 2024ची कागदोपत्री सुसज्जता प्रशासनामार्फत करण्यात आली असली तरी दुसरी यंत्रणा राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांचे कार्यकर्ते राबवित असतात. या विधानसभा निवडणुकीसाठीही प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
माणगाव, महाड व पोलादपूर या तीन तालुक्यातील 343 ठिकाणी एकूण 393 मतदान केंद्र असून यात शहरी 30 तर ग्रामीण भागात 363 मतदान केंद्रांचा समावेश आहे. यापैकी मोबाईलफोनद्वारे संपर्कक्षेत्रात असलेली मतदान केंद्र 375 असून मोबाईल आणि लॅण्डलाईन अशा दोन्ही प्रकारे संपर्कात असलेल्या मतदान केंद्राची संख्या 18 आहे.
पोलादपूर तालुक्यात 6 आणि महाड तालुक्यातील महाड विधानसभा मतदार संघाची लोकसंख्या 3 लाख 73 हजार 709 असून यामध्ये मतदार संख्या 2 लाख 92 हजार 784 आहे. यातील पीडब्ल्यूडी व्होटर्सची संख्या  माणगांवमध्ये 650 महाडमध्ये 1170 आणि पोलादपूरमध्ये 483 अशी एकूण विधानसभा मतदार संघात 2303 आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या मतदारांची विधानसभा मतदार संघातील संख्या 6  हजार 894 आहे. देशसेवेतील मतदार 457 आहे. आखाती देशातील मतदार 4 आहेत.
महाड विधानसभा मतदार संघात 3 तालुक्यातील माणगावमधील 29 ग्रामपंचायती, महाडमधील 134 ग्रामपंचायती तर पोलादपूर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींचा अशा एकूण 205 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. महाड आणि पोलादपूर अशा नगरविकास खात्यांतर्गत नगरांचा समावेश आहे. 3 तहसिल कार्यालयापैकी 404 महसूली गावांचा समावेश आहे. माणगाव 4 महाड 9 आणि पोलादपूर 3 अशा एकूण 16 मंडल कार्यालयांचा समावेश आहे. माणगांव तालुक्यातील 155, महाड तालुक्यातील 272 तर पोलादपूर तालुक्यातील 103 असा एकूण 530 प्राथमिक शाळांचा समावेश आहे. 7 उच्च माध्यमिक कॉलेज, 5 वरिष्ठ महाविद्यालये तर महाड तालुक्यात एकूण वीर, विन्हेरे, करंजाडी व वामनेसापे अशी 4 रेल्वे स्थानकं आहेत.
2024 मधील प्रस्तावित लोकसंख्या माणगाव तालुक्यात 54 हजार 354 पुरूष आणि 52 हजार 997 महिला अशी 1 लाख 7 हजार 350 आहे. महाड तालुक्यात 1 लाख 2550 पुरूष आणि 1 लाख 159 महिला अशी एकूण लोकसंख्या 2 लाख 2709 आहे. पोलादपूर तालुक्यात 32 हजार 227 पुरूष आणि 31 हजार 423 अशी एकूण 63 हजार 650 लोकसंख्या आहे. म्हणजेच महाड विधानसभा मतदार संघात 1 लाख 89 हजार 130पुरूष आणि 1 लाख 84 हजार 584 अशी एकूण 3 लाख 73 हजार 709 लोकसंख्या आहे. यापैकी माणगाव तालुक्यात 44 हजार 710 पुरूष आणि 44 हजार 750 महिला अशी 89 हजार 460 मतदारसंख्या आहे. महाड तालुक्यात 79 हजार 418 पुरूष आणि 80 हजार 213 महिला अशी 1 लाख 59 हजार 631 मतदारसंख्या आहे. पोलादपूर तालुक्यात 21 हजार 562 पुरूष आणि 21 हजार 131 महिला अशी एकूण 43 हजार 693 मतदार संख्या आहे. म्हणजेच महाड विधानसभा मतदार संघात 1 लाख 45 हजार 690 पुरूष आणि 1 लाख 47 हजार 94 अशी एकूण 2 लाख 92 हजार 784 मतदार संख्या आहे.
माणगांवमध्ये महाड तालुक्यात 213, माणगाव तालुक्यात 113 आणि पोलादपूर तालुक्यात 67 अशी एकूण मतदान 393 केंद्र असून 393 मतदान केंद्र निहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये माणगांवमधील 97 शिक्षक, 2 ग्रा.पं.कर्मचारी, 31 अंगणवाडी सेविका, कृषीसहायक 1 आणि 2 तलाठी असे 113 कर्मचारी महाडमधील 105 शिक्षक, 65 ग्रा.पं.कर्मचारी, 10 अंगणवाडी सेविका, कृषीसहायक 9 आणि 24 तलाठी असे 213 कर्मचारी तर पोलादपूरमधील 33 शिक्षक, 18 ग्रा.पं.कर्मचारी, कृषीसहायक 8 आणि 8 तलाठी असे 65 कर्मचारी तर संपूर्ण महाड विधानसभा मतदार संघामध्ये 215 शिक्षक, 85 ग्रा.पं.कर्मचारी, 41 अंगणवाडी सेविका, कृषीसहायक 18 आणि 34 तलाठी असे 393 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
नोडल ऑफिसर टिम 15, सेक्टर ऑफिसर्स 61, सेक्टर पोलीस ऑफिसर्स 61, फ्लाईंग सर्व्हेलन्स टिम  9 पथकांत 30 कर्मचारी, स्टॅटीक सर्व्हेलन्स टिम 9 पथकांत 30 कर्मचारी, व्हिडीओ सर्व्हेलन्स टिम 9 पथकांत 41 कर्मचारी, व्हिडीओ व्हिवींग टिम 1 पथकांत 3 कर्मचारी आणि अकाऊंटींग टिम 1 पथकांत 14 कर्मचारी, अशा प्रशिक्षित करण्यात आले असून आवश्यक मनुष्यबळ 1965 आणि 2718 डाटा एन्ट्री स्टाफ असे आहे.
———————————————
-पोलादपूर तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुक काळात अंगणवाडी सेविका आणि आशासेविका या बहिणींना निवडणूक काळातील भत्ता आणि भोजन देण्याची तरतूद नसल्याने त्यांचे अतोनात हाल झाले होते म्हणून विधानसभा निवडणूक काळात या बहिणींचा समावेश करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading