पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी महाविद्यालयातील प्राध्यापक एस. टी. वानखेडे सरांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. एस.टी. वानखेडे सरांच्या नियुक्ती नंतर त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे. गेली अनेक वर्ष या महाविद्यालयाने लाखो विद्यार्थ्यांना घडवले आहे शैक्षणिक दर्जा कायम ठेवत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे काम महाविद्यालय करत आहे. सध्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. आरती वानखेडे या काम करत असून उपप्राचार्य पदी नुकतीच एस.टी. वानखेडे सरांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे सध्याचे चेअरमन आनंदराज आंबेडकर यांनी महाविद्यालयाला भेट देऊन वानखेडे सरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
प्राध्यापक एस.टी. वानखेडे हे गेली अनेक वर्ष ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी त्यांची धडपड कायम असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना बारावीनंतर काय करता येईल याबाबत नेहमीच मार्गदर्शन करतात. शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचा कायम पुढाकार असतो यामुळे उपप्राचार्य पदी नियुक्ती होतात महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आणि महाड मधील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.