महाड-पोलादपूरमधील कातकरी समाजाचा मासेमारी व्यवसाय सरकारने हिरावला

Poladpur Masemari
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय रद्द करण्याच्या निर्णयामुळे समाजबांधव संतप्त झाले आहेत.
रायगड जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी जुन्या परिपत्रकाचा आधार घेत ठेक्यांचे नुतनीकरण नाकारले. या निर्णयाविरोधात कातकरी बांधवांनी आयुक्तांना घेराव घालून विरोध दर्शविला.
आदिवासी बांधवांचा आरोप आहे की, हा निर्णय मोठ्या ठेकेदारांना आर्थिक लाभ देण्यासाठी घेतला गेला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह मंत्री निलेश राणे व मंत्री भरत गोगावले यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
यावेळी सर्वश्री देवपूर व खडपी ग्रा. पं.चे माजी सरपंच व लोक प्रतिनिधी दिपक साबळे, पोलादपूर येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. जोगेश्वरी गाडीतळचे चेअरमन काशिनाथ पवार, कातकरी आदिवासी आधार संघटना पोलादपूर अध्यक्ष पांडुरंग वाघे, रायगड आदिवासी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था कोथुडर्ेचे गोविंद हिलम, चापगाव-महाडचे माजी सरपंच पांडू नथू काटकर, कोथुडर्ेचे ग्रा.पंचायत सदस्य किसन सिताराम पवार, खैरे आदिवासी मच्छिमार वि.का.सहकारी संस्था मर्या.चे चेअरमन मिथुन मुकणे,जननीदेवी आदि. मच्छिमार वि.का. सह. संस्था मर्या. आंबवडेचे चेअरमन अशोक मुकणे, आदिवासी कातकरी मच्छिमार वि.का. सह.संस्था मर्या. वरंधचे चेअरमन चंद्रकांत निकम हे 5 सहकारी संस्थांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
——————————————————
महाड व पोलादपूर तालुक्यातील मच्छिमार समाजामार्फत पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मत्स्यबीज सोडून पावसाळयाने जोर धरेपर्यंत मासेमारी करण्यात येत असते. जुलै महिनातच धरण ओव्हरफ्लो झाल्यास पूर्ण वाढलेले मासे या पाण्यासोबत नदीपात्रातून वाहून जातात. त्यामुळे याकाळात मत्स्यबीज रानबाजिरे धरणामध्ये सोडल्यास त्यापासून मत्स्योत्पादन अपेक्षेप्रमाणे होत नाही. बॅकवॉटरचा तलाव हा इंग्रजी व्ही आकाराचा असून या पात्रामध्ये खुप झाडी कचरा व शेवाळ झाल्याने मच्छीमारी करण्यापूर्वी त्याची सफाई न केल्याने गैरसोय होत आहे.
…दीपक साबळे, माजी सरपंच देवपूर ग्रा.पं.पोलादपूर
——————————————————
पोलादपूर येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. जोगेश्वरी गाडीतळ या संस्थेवर रानबाजिरे येथील सावित्री धरणाच्या तलावाचा ठेका दरवर्षी असूनही यंदा सावित्री, वरंध, कोथुर्डे, खैरे व खिंवाडी या पाचही तलावांचे ठेके मत्स्यव्यवसाय विभागाचे रायगड जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी रद्द केल्याने आदिवासी कातकरी समाज या पारंपरिक व्यवसायापासून दुरावला जाऊन पोटापाण्यासाठी या आदिवासींचे स्थलांतर घडवून आणण्यासोबतच या तलावांचे ठेके बडया व्यावसायिकांना देण्याचा आदिवासी कातकरी विरोधी विचार ते कृतीत आणत असल्याचे सांगून शासनाकडे याप्रश्नी आम्ही आदिवासी सर्वप्रकारे संघर्ष करून न्याय मिळविण्याच्या पवित्र्यात असल्याचे सांगितले. 
…काशिनाथ पवार. चेअरमन, आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. जोगेश्वरी गाडीतळ-पोलादपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading