महाड तालुक्यामधून जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत या नक्षलवाद्याला ताब्यात घेतले आहे. दिनांक 27 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देशमुख कांबळे या गावातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाड एमआयडीसी पोलीस व बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. संबंधित आरोपीवर 2014 मध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.मागील काही महिन्यापूर्वी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना देखील अटक करण्यात आली होती तर खून करून पळून आलेला मध्यप्रदेश येथील आरोपी देखील महाड तालुक्यातच सापडल्याने सर्वत्र खळबळ पसरली आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा संभाव दौरा होत असून देशमुख कांबळे गावच्या हद्दीतील एका नामांकित कारखान्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री येणार असल्याने पोलीस प्रशासन मात्र ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.
या जहाल नक्षलवाद्याने दहा वर्षांपूर्वी बिहारमध्ये गुन्हे केले आहेत. तेव्हापासून तो फरार होता, अशी माहिती मिळते. त्याच्यावर देशद्रोहाचा तसेच यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यास रायगड पोलिसांनी नकार दिला आहे.
सदर नक्षलवादी हा महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहती मध्ये गेल्या दीड महिन्यापासून बिहार येथून पळून आला असल्याची टास्क फोर्स कडून माहिती महाड उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली होती सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्या सूचनेनुसार महाड एम आय डी सी पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांच्या कर्मचारी तसेच बिहार येथून आलेले टास्क फोर्सचे अधिकारी कर्मचारी यांनी दिवसभर पाळत ठेवले होते. रात्रीच्या वेळी तो बेसावध असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर नक्षलवादी हा महाड औद्योगिक वसाहती मध्येओळख लपवून बिघारीची कामे करीत होता. त्याला आज पोलादपूर न्यायालयात हजर करून त्यास बिहार टास्क फोर्स घेऊन बिहारसाठी रवाना झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.