महाड तालुक्यात २८ ग्रामसेवकांच्या रिक्त पदामुळे प्रशासनाच्या कारभारावर अतिरिक्त ताण? ग्रामपंचायत मधील कामे ठप्प

gramsevak
महाड ( मिलिंद माने ) : महाड तालुक्यांमध्ये एकुण १३४ ग्रामपंचायती असुन या पंचायतीच्या माध्यमांतुन गावांतील नागरिकांची महत्वाची शासकीय कामे केली जातात, परंतु राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असुन गेल्या मागील दोन वर्षापासून तालुक्यातील २८ ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेंत. त्याच प्रमाणे विस्तार अधिकार्‍यांची तीन पदे  असुन त्या पैकी एक पद रिक्त आहे. अश्याच प्रकारे अन्य विभागांमध्ये देखिल रिक्त पदे असल्यामुळे ग्रामिण भागांतील ग्रामपंचायतच्या प्रसायकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला असुन रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र महाड पंचायत समितीमध्ये पाहण्यात मिळत आहे.
शासनाच्या प्रत्येक विभागांमध्ये महत्वाची पदे गेल्या दोन वर्षापासून रिक्त असल्याने त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होत असुन सर्व सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेंत. शहरी भागा पेक्षा ग्रामिण भागांतील प्रसायकीय कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
शासनाच्या प्रत्येक विभागांमध्ये महत्वाची असणारी सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे होत नाहीत.शहरी भागा पेक्षा ग्रामिण भागांतील जनतेची अक्षरश: शासना कडून पिळवणुक केली जात आहे. तालुक्यामध्ये १३४ ग्रामपंचायती आहेंत त्याच बरोबर महसुली गावांची संख्या 188 आहे महाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाची लोकसंख्या 2011 च्या तुलनेत138955. असून पुरुष91457,. तर स्त्रिया88374. तर महाड तालुक्याचे क्षेत्रफळ796.67. चौरस मीटर आहे महाड तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण 81.90% आहे यामध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 79.46% तर महिला साक्षरतेचे प्रमाण 67.22% त्याचप्रमाणे सहा वर्षाखालील बालकांची संख्या19o44. तर सहा वर्षा पर्यंत मुलांची संख्या9787. व मुलींची संख्या9257. आहे महाड तालुक्यात नऊ मंडळी असून तलाठी सजा ची संख्या 51 आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे अनेक  गावांतुन जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील पदे रिक्त असल्यामुळे सर्व सामान्यांना अर्थिक नुकसानी बरोबर तालुक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी यावे लागत असल्याने नाहक वेळ व पैसा खर्च होऊन आर्थिक तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे शासकीय कामानिमित्त  कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारुनही कामे होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून केल्या जातात परंतु स्थानिक लोक प्रतिनिधी त्याच बरोबर उच्च पदस्थ अधिकारी सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्या ऐवजी अपमानास्पद वागणूक ग्रामीण भागातील नागरिकांना देखील देत आहेत. व त्यांच्या समस्या सोडविण्याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येते.
महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना आपली गाव पातळीवर कामे पुर्ण होण्या करीता ग्रामसेवकाचेपद नियुक्त करण्यांत आले. प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवका कडून जन्म मृत्यु दाखला,रहिवासी दाखला,बांधकामाचे परवाने त्याच बरोबर कर वसुली, गावातील स्वच्छता दिवाबत्ती इत्यादी महत्वाची कामे केली जातात.गाव पातळीवर मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याचे महत्वाचे काम ग्रामसेवका कडे देण्यांत आलेले आहे.परंतु प्रत्यक्षांत तालुक्यामध्ये २८ ग्रामसेवकांचीपदे रिक्त असल्यामुळे एका ग्रामसेवका कडे तीन ते चार गावांचा पदभार सोपविण्यांत आलेला आहे.चार चार पंचायती मधुन काम करीत असल्याने नागरिकांना मात्र ग्रामसेवकाची भेट होणे शक्य होत नाही त्यातच ग्रामसेवक हे एखाद्या ग्रामपंचायत मध्ये नियुक्ती असताना त्या ग्रामपंचायती क्षेत्रातील रहिवाशांना आपला मोबाईल नंबर एक देतात तर दुसऱ्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना दुसरा मोबाईल नंबर देतात प्रत्यक्षात मात्र दोन्ही नंबर बंद करून आपला कार्यभार हाकण्याचे काम ग्रामसेवक करीत असल्याने ग्रामपंचायत पातळीवरील नागरिकांची कामे महिने न महिने रखडत असल्याचे चित्र महाड तालुक्यातील ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.
एकेका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्याने अनेक ग्रामसेवक एकेका ग्रामपंचायत मध्ये आठ ते दहा दिवस फेरफटका देखील मारत नाहीत अनेक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार असल्याचा गैर फायदा घेऊन अनेक ग्रामसेवक कामावर गैर हजर राहातात. परिणामी नागरिकांची कामे ठप्प झाली आहेत याबाबत नागरिकांनी अनेक तक्रार वरिष्ठां कडे करून देखील कोणताही उपाय यावर केला जात नाही ज्या लोकप्रतिनिधींना ज्या नागरिकांनी निवडून दिले ते लोकप्रतिनिधी देखील नागरिकांना वाऱ्यावर सोडत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न महाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. तालुक्यातील जनतेच्या तक्रार अर्जाला पंचायत समितीमध्ये केराची टोपली दाखविली जात असल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत जिल्हा परिषद,पंचायत समित्या महसुल विभागा प्रमाणे शासनाच्या प्रत्येक विभागांतुन शेकडो पदे रिक्त आहेंत.अश्या रिक्त पदांचा सरकारी कामावर विपरीत परिणाम होत असताना लोक प्रतिनिधी मात्र सत्ता मिळविण्याच्या नादांत आहेंत.
प्रशासनाकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यां मध्ये सर्व सामान्यांच्या कामा बाबत उदासिनता आहें. महाड तालुक्यामध्ये असलेल्या ग्रामसेवकांची पदे त्वरीत भरण्यांत यावींत अशी मागणी ग्रामिण भागांतुन होत असताना मात्र नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading