महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर; ५०% जागांवर महिलांचा राज

Sarpanch

महाड (मिलिंद माने) : 
महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आज तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न भंग पावले असून, काहींना आनंदाचे गारुड लाभले.
ही सोडत पेण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाड तहसीलदार संतोष शितोळे यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सरपंच पदासाठी इच्छुक असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहीर झालेल्या आरक्षणात अनुसूचित जातींसाठी ३ खुल्या आणि ३ महिला जागा, अनुसूचित जमातींसाठी ५ खुल्या आणि ४ महिला जागा, मागास प्रवर्गासाठी १८ खुल्या आणि १८ महिला जागा, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४१ खुल्या आणि ४२ महिला जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये एकूण ५०% जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, त्यामुळे ६७ ग्रामपंचायतींमध्ये महिला नेतृत्व पाहायला मिळणार आहे.
आरक्षणाच्या निकालानंतर काही ठिकाणी उमेदवारांच्या चेहऱ्यावर निराशा तर काही ठिकाणी आनंद ओसंडून वाहताना दिसला. काही इच्छुकांनी “गुडघ्याला बाशिंग” बांधले होते, मात्र आरक्षणामुळे त्यांना घरी परतावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading