महाडमध्ये शिवसैनिकांचा संताप: आर्थिक पाठबळ देणारा नेता पाठवा, अन्यथा आमच्याच ताकदीवर लढू!

Mahad Shivsena Ubatha
महाड (मिलिंद माने) :
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पराभवास कारणीभूत असलेल्या नेत्यांवर कारवाई होत नसल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी अखेर विरोधकांची सत्ता संघर्ष करण्यासाठी मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा आर्थिक ताकद देणाऱ्या नेत्याला महाड विधानसभा क्षेत्रात पाठवा अन्यथा आम्ही आमच्या ताकदीवर समर्थ आहोत असा इशारा शिवसैनिकांनी शिवसेना नेत्यांना दिला आहे
कोकणातील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील तोच प्रत्येक आल्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण चालू आहे त्यातच खचलेल्या शिवसैनिकांना धीर देण्याऐवजी व त्यांना आर्थिक सक्षम करण्याऐवजी केवळ उपदेशाचे डोस देण्याचे काम मुंबईतील शिवसेना नेत्यांकडून व संपर्क नेत्याकडून होत असल्याने ग्रामीण भागातील कडवट व बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक मात्र संतप्त झाला आहे.
१९४ महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या माजी आमदार कै, माणिकराव जगताप यांच्या कन्या. स्नेहल माणिकराव जगताप यांनी निवडणुकीच्या काळात काँग्रेस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला मात्र बावीस हजार मतांनी त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून भाजपाची वाट धरण्याचा निर्णय घेतला मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी राष्ट्रवादी पुन्हा या म्हणीप्रमाणे स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
महाडच्या माजी नगराध्यक्ष नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पुन्हा प्रवेश घेतल्याने १९४ महाड विधानसभा मतदारसंघाला वालीच उरला नाही अशी स्थिती. झाल्याने व या स्थितीला पक्षाचे मुंबईतील वरिष्ठ नेते कारणीभूत असून खचलेल्या शिवसैनिकांना धीर देण्याऐवजी उपदेशाचे पोकळ स्वरूपाचे डोस देणाऱ्या शिवसेना नेत्यांमुळे बाळासाहेबांचा कडवट व निष्ठावंत शिवसैनिक मात्र हतबल झाला आहे. मुंबईतील शिवसेना नेते व संपर्क प्रमुखांच्या पुढे केवळ आम्ही पायघड्या टाकून सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का असा सवाल १९४ महाड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत झाल्याचे शिवसैनिकांमधून चर्चिले जात आहे
मुंबईतील शिवसेना नेते व पदाधिकारी व संपर्कप्रमुख यांना कोकणात पाठवताना केवळ मुंठी आवळणारा नेता मातोश्रीने पाठवू नये तर मतदार संघातील शिवसैनिकांना आर्थिक रसद व धीर देणारा नेता पाठवा अन्यथा आम्ही आमच्या ताकदीवर विरोधकांशी लढण्यास समर्थ आहोत अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी झालेल्या बैठकीत घेऊन आपल्या भावना मुंबईतील शिवसेना नेत्यांपुढे व पदाधिकाऱ्यांना कळविण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांना कळविल्याने आगामी काळात कोकणात निष्ठावंत शिवसैनिक मुंठी आवळणाऱ्या नेत्याला कोकणात विरोध करणार असल्याचे चित्र यापुढे पाहण्यास मिळणार असून कडवट शिवसैनिकांच्या रोशाला या नेत्यांना आगामी काळात सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading