महाडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी, अभिवादन करण्यासाठी चवदार तळ्यावर गर्दी

Mahad Ambedkar1
महाड ( मिलिंद माने ) :
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती महाड क्रांतिभूमी जल्लोषात साजरी झाली. यावेळी चवदार तळे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती महड शहरात तसेच तालुक्यामध्ये धूमधडाक्यात साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच महाड शहरातील चवदार तळे येथे भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती . महाड, माणगाव ,पोलादपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गोगावले, माजी आमदार अनिकेत तटकरे माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत महामानवाला अभिवादन केले
महाड शहरातील नागरिकांनी 13 एप्रिल च्या मध्यरात्री मेण बत्ती प्रज्वलित करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला शहरातील विविध भागातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.
महाड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात देखील . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करत भीम जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अखिल भारतीय शिक्षक परिषदेच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले गेले होते यावेळी शेकडो शिक्षकांनी रक्तदान करत अभिवादन केले.
महाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी तालुक्यातील नडगाव, सव, कोल, गांधार पाले, या गावातील आखाड्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता खालुबाजा ,ढोल- ताशे आणि लेझीम पथकांनी ही मिरवणूक संपूर्ण शहरातून क्रांतीस्तंभ येथे घेण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एक जयघोष झाला. दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मधुकर गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या वतीने येणाऱ्या भीमसैनिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची सुविधा करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading