मीटरच्या जुन्या वादातून शॉकप्सरचा पाईप मारून जखमी केल्या प्रकरणी एका आरोपीला महाड औद्योगिक वसाहत पोलीसानी अटक केली आहे.
महाड तालुक्यातील नांगलवाडी येथे जुन्या वादातून एका व्यक्तीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील शुभ लाभ सोसायटी येथे घडली असून आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण रामचंद्र साळुंखे राहणार शिवथर तालुका महाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी व जखमी यांचा पिण्याचे पाणी यावरून याचा जुनावाद सुरू झाला. यातच चंद्रकांत तुकोबा कराडे याने संभाजी दिगंबर मोरे यांच्या डोक्यात शॉकप्सरचा पाईप घालून त्यांना जीवे मारण्याचा ठार प्रयत्न केल्याची घटना बुधवार ८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
चंद्रकांत तुकोबा कराडे रा. तुळसण, तालुका कराड,जिल्हा सातारा असे आरोपीचे नाव असून संभाजी दिगंबर मोरे रा.कडेगाव, तालुका अमरापुर, जिल्हा सांगली असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे दोघेही सध्या महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील शुभ लाभ सोसायटी येथे राहत होते. किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर अखेर डोक्यात शॉकप्सर चा पाईप घालण्यापर्यंत गेले.
याबाबत संबंधित आरोपी विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे प्राण घातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रकार केल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.