महाड ( मिलिंद माने ) :
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाखालून वाळूच्या अनधिकृत बार्जेच्या वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला असताना देखील तसेच पुलाखालून अनधिकृत बार्जेशी वाहतूक बंद करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले असताना देखील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या व महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे आंबेत पुलाची स्थिती धोकादायक झाली असून हा पूल कोसळण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकत ईसाने यांनी राज्य सरकारला याबाबत लेखी पत्र पाठवून या पुलाखालून अनधिकृत बार्जेश ची वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकिर्दीत झाला होता मात्र या पुलाखालून अनधिकृत रित्या वाळूच्या बार्जेस मधून वाहतूक चालू असताना या पुलाच्या पाच नंबरच्या पिलरला धक्का लागून पुलाचा काही भाग कमकुवत झाल्याने मागील अडीच वर्ष या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.
