मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या माणगांवातील जोशी वडेवाले हॉटेल अखेर मनसेने केलं बंद

Mangav Joshi Vadevale Hotel
महाड ( मिलिंद माने ) :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगांव रेल्वे स्टेशन जवळील जोशी वडेवाले नावाच्या हॉटेल मालकाने व त्याच्या कर्मचाऱ्यांनी मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होऊन अखेर जोशी वडेवाले हॉटेल आज बंद करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नामांकित जोशी वडेवाले हॉटेल येथे गणपती उत्सवा मध्ये कोकणात जाणारे चाकरमानी या उपहारगृहात थांबले असता वड्यामध्ये मीठ कमी आहे. याचा जाब विचारल्यानंतर जोशी वडेवाले हॉटेल मालक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मराठी माणसांना व व गरोदर असणारे त्याच्या पत्नीला मागील आठ दिवसांपूर्वी मारहाण केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्यानं आज जोशी वडेवाले हॉटेल अखेर मनसेच्या दणक्यानं पोलिसांकडून बंद करण्यात आले.
माणगांव मधील जोशी वडेवाले हॉटेलमधील मालकाने व कर्मचाऱ्यांनी मराठी माणसावर झालेल्या मारहाणी प्रकरणी परप्रांतीय हॉटेल चालक जैस्वाल यांचावर कारवाई होऊन हॉटेल बंद करावे या करिता श्रीवर्धन तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष चिमण सुकधरे, उपजिल्हा अध्यक्ष सुबोध जाधव, उपजिल्हा अध्यक्ष मृदास तोंडलेकर, सौरभ गोरेगावकर म्हसळा तालुका अध्यक्ष, शेखर सावंत यांनी माणगांव पोलीस निरीक्षक बोराडे यांना निवेदन दिले. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जोशी वडेवाले हॉटेल बंद करण्यात आले.
————————————
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष कोकणचे नेते वैभव खेडेकर यांनी यापुढे कोकणातील मराठी माणसाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही उपहारगृहात नारायण झाली अथवा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने हॉटेल मालकाला धडा शिकवला जाईल असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading