पेण (प्रतिनीधी)
निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थांडवण्याच्या शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन मला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा पाठिंबा असल्याची माहिती पत्रकारांना दिली होती आणि तशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर झळकल्या नंतर आज पेण मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आमच्या मराठा समाजाचा कोणताही पक्ष किंवा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले. यावेळी मराठा समाजाचे नेते भाई मंगेश दळवी यांच्यासह पेण तालुका मराठा समाज अध्यक्ष पांडुरंग शिंदे, अनिलभाऊ खामकर, शिरीष मानकावळे, सचिन पवार, नामदेव गायकर आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी काल मराठा समाजाच्या पाठिंब्यावर केलेले वक्तव्य हे दिशाभूल करणारे आहे. सदर पाठिंब्या बाबत त्यांच्याकडे तसे अधिकृत लेखी पत्र असेल तर त्यांनी दाखवावे असे देखील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतःच्या उमेदवारीसाठी किंवा वैयक्तीक स्वार्थासाठी कुणीही मराठा समाजाचा गैरफायदा घेऊ नये असे देखील त्यांनी सांगितले.