मद्यधुंद अवस्थेतील टँकर चालकाची उभ्या 3 वाहनांना जोरदार धडक

Lohap Accident
रायगड (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील लोहप-इसांबे रत्यावरील लोहोप थांबा येथे मंगळवारी (दि.25) रात्री अकराच्या सुमारास मोठा अपघात झाला. वाशिवलीहून इसांबे गावाच्या दिशेने जाणाऱ्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कार व एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहने जबरदस्त चिरडली गेली. या अपघातमधील ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवार दि .२५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास वाशिवली येथून इसांबे गावाच्या दिशेला जाणाऱ्या MP- 09 -HH- 8688 या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकर ने लोहप् स्टॉप जवळ उभ्या असलेल्या चार चाकी वाहन MH- 46 -CH- 7009 व MH- 46 -AL-1420 अश्या दोन वॅगनार तसेच दुचाकी MH- 46- CB -3994 या वाहनांना जोरदार धडक दिली.
सदर जखमींना स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून अपघातात कुठलेही जीवितहानी झाली नाही, अपघात ग्रस्त लोहप्, कोपरी ,दांडवाडी तळवली येथील असल्याचे समजते . घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिला.
सदर माहिती कळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस स्टेशनचे अधिकारी जाधव व सूर्यकांत ठोंबरे यांनी पुढील अपघाती ठिकाणची परिस्थितीत नियंत्रणात आणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून घटनेचा पुढील तपास व कारवाई चालू केली.
इसांबे येथे मोठ्या प्रमाणात विस्तारीत होत असलेल्या औद्योगिकी कारणामुळे रस्ता अरुंद पडत असून अवजड वाहनांच्या रहदारी मुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अरुंद रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांच्या मुळे लोहप् स्टॉप हे अपघाती क्षेत्र ठरत आहे .
यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सतत होत असलेले अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाणी तात्काळ गतीरोधक बसवावे अशी मागणी माजी उपसरपंच बबन दादा पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading