राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला अवघे 24 तास शिल्लक आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगी एकीकडे निवडणूक आयोग व प्रशासकीय यंत्रणा मतदानाची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे मतदारांमध्ये विविध प्रश्न आणि संभ्रम दिसून येत आहे.
मतदार ओळखपत्राशिवाय मतदान कसं करावं?
सामान्यतः मतदानासाठी फोटो असलेलं मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) आवश्यक मानलं जातं. मात्र, सर्व मतदारांकडे ते उपलब्ध नसतं. अशा परिस्थितीत, मतदारांना सुलभतेसाठी निवडणूक आयोगाने अन्य 12 ओळखपत्र स्वीकारण्याची घोषणा केली आहे.
10. शासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रातील छायाचित्रयुक्त सेवा ओळखपत्र
11. संसद, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र
12. दिव्यांगांसाठीचे विशेष ओळखपत्र
मोबाईल फोन घेऊन नेता येईल का?
मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन नेण्यास बंदी आहे. मतदान प्रक्रिया गोपनीय राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही बंदी लागू केली गेली आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरण्यावरही निर्बंध आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेनुसार कारवाई होऊ शकते.
महत्त्वाची सूचना:
मतदानासाठी मतदारांनी योग्य ओळखपत्र सोबत नेण्याची खात्री करावी. मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. मतदान हा आपल्या लोकशाहीचा आधार असून, प्रत्येक मतदाराने आपला हक्क जबाबदारीने बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.