वेळास आगर (संतोष शिलकर) :
श्रीवर्धन तालुक्यातील भेंडखोल येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले उत्तराभिमुखी रामभक्त हनुमतांच्या मंदिराचे भूमिपूजन नुकत्याच पार पडलेल्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधत रविवार दि.१३/४/२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
येथील अखंड भंडारी समाज भेंडखोल यांनी विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या झेंड्या खाली येऊन व रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचे नेतृत्व स्विकारले.त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या दृष्टीने निष्ठेने काम करत आहेत.
या कामी मौजे भेंडखोल भंडारी समाजानी खासदार सुनील तटकरे यांच्या कडे केलेली मागणीचा आदर करून गावातील या प्रमुख मंदिराच्या जीर्णोद्वारा करिता खासदार फंडातून २५ लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्या मान्य करून त्या निधीचा पहिला टप्पा पूर्ण करण्या करिता आजचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास भेंडखोल भंडारी समाजाचे अध्यक्ष विराट मयेकर, उपाध्यक्ष केतन कोलथरकर,प्रणय पुलेकर,सचिव विशाल कोलथरकर,खजिनदार सुयोग मयेकर, प्रथमेश, स्वप्निल,अंकित कोलथरकर,केवल चव्हाण,सुभाष कोलथरकर गुरुजी,देवेंद्र पाटील,विक्रांत कोलथरकर, विजय पाटील उपसरपंच हरिहरेश्वर ग्रामपंचायत, महिला अध्यक्षा तवसाळकर मॅडम, कोलथरकर मॅडम, समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाज बांधव,भगिनी सर्व लहान थोर तरुण मित्र मंडळातील सर्व सदस्य,सदस्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी तालुका अध्यक्ष दर्शनभाई विचारे यांचा भंडारी समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
——————————
[ मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पर्यटनाच्या दृष्टीने मंदिराची प्राचीन अस्तित्वाची संकल्पना जोपासत अधिक सुंदरतेने व लवकरात लवकर काम पूर्ण करून घेण्या संदर्भात तसेच पुढील टप्प्याकरिता लागणारा निधी सुद्धा आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करून साहेबांनी ग्रामस्थांना दिलेले वचन लवकरात लवकर पूर्ण होईल, तसेच गावातील रोड सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून त्या वचनपूर्तीचे काम लवकरच करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी आदरणीय खासदार साहेब तसेच मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे या जनसेवेच्या कामात व्यस्त असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम असल्याची प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी व्यक्त केली.]