भीषण आग! माणगावजवळ ट्रकला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान

Koad truck fire
कोलाड (श्याम लोखंडे) :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील माणगाव पासून केवळ एक किलोमीटर अंतरावर, महाड बाजूकडून दहिसरकडे स्टेनलेस स्टील फिल्टर घेऊन जाणाऱ्या ट्रक (क्र. MH-04 MH-5693) ला सोमवार, दिनांक ५ मे २०२५ रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
ही आग ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित प्रसंगावधान दाखवत ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी माणगाव अग्निशमन दल व माणगाव पोलिसांना तात्काळ माहिती दिली.
माणगाव अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र ट्रकमधील साहित्य अत्यंत ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे रोहा-धाटाव अग्निशमन दल आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आले.
रात्री साडेबारा वाजता शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास ५० हजार लिटरहून अधिक पाणी वापरण्यात आले आणि अखेरीस सकाळी पावणे सहा वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीत ट्रक व त्यामधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading