भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्धसज्जतेच्या मॉकड्रीलचा प्रारंभ; महाराष्ट्रातील 16 ठिकाणी सराव

Mocdrill
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्धसज्जतेच्या मॉकड्रीलचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संघर्ष अधिक गंभीर होत असून युद्धजन्य परिस्थितीच्या शक्यतेनं केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयानं देशभरातील विविध राज्यांना मॉकड्रील घेण्याचे निर्देश दिले असून युद्धकाळातील उपाययोजनांचा सराव त्याअंतर्गत होणार आहे. नागरिकांना हवाई हल्ल्यांपासून बचाव, ब्लॅकआऊट, प्राथमिक उपचार आणि तातडीच्या आपत्कालीन उपाययोजनांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

📍 महाराष्ट्रात कुठे होणार मॉकड्रील?
महाराष्ट्रातील 16 ठिकाणी हा सराव केला जाणार आहे:
  • १. मुंबई
    २. उरण-जेएनपीटी
    ३. तारापूर
    ४. पुणे
    ५. ठाणे
    ६. नाशिक
    ७. थळ-वायशेत
    ८. रोहा-धाटाव-नागोठाणे
    ९. मनमाड
    १०. सिन्नर
    ११. पिंपरी-चिंचवड
    १२. संभाजीनगर
    १३. भुसावळ
    १४. रायगड
    १५. रत्नागिरी
    १६. सिंधुदुर्ग

🛡️ मॉकड्रीलमध्ये काय काय होणार?
  • हवाई हल्ल्याची पूर्वसूचना
  • सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचं प्रशिक्षण
  • रात्री ब्लॅकआऊट कसा करावा याचं प्रशिक्षण
  • महत्त्वाच्या ठिकाणांचं संरक्षण
  • नागरिकांसाठी आपत्कालीन बचाव प्रशिक्षण
  • घरात पाणी, अन्न व इंधन साठवणुकीबाबत जागृती

🚨 कुठे वाजणार सायरन?
  • प्रशासकीय भवन
  • शासकीय इमारती
  • पोलीस मुख्यालय
  • अग्निशमन दल
  • लष्करी तळ
  • बाजारपेठा
  • गर्दीची ठिकाणं

⚠️ सायरन वाजल्यावर काय करावं/करू नये?
  • घाबरून जाऊ नका
  • अफवांवर विश्वास ठेवू नका
  • तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या (5-10 मिनिटांत)
  • मोकळ्या जागेपासून दूर राहा
  • रेडिओ/टीव्ही/शासकीय इशाऱ्यांकडे लक्ष द्या
  • सुरक्षित इमारतीत प्रवेश करा

🌍 देशभरात किती ठिकाणी होणार मॉकड्रील?
देशातील 244 जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रील राबवले जाणार आहे. 1971 नंतर पहिल्यांदाच नागरिकांच्या सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर युद्धसज्जतेचा सराव होतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading