भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी सुवर्णसंधी! मग येथे घ्या मोफत प्रशिक्षण

Indian army
मुंबई :
भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्य करणे ही अनेक तरुणांची मोठी अभिलाषा असते. मात्र, लष्करात भरतीसाठी आवश्यक असलेल्या एस.एस.बी. (SSB) मुलाखतीसाठी उत्तम तयारी आवश्यक असते. आता महाराष्ट्रातील इच्छुक युवक-युवतींसाठी ही तयारी करण्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक ५ मे ते १४ मे २०२५ दरम्यान एस.एस.बी. कोर्स क्र. ६१ आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये निःशुल्क प्रशिक्षण, निवास, व भोजनाची सोय करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील उमेदवारांनी दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) च्या वेबसाईटवरून SSB-६१ कोर्सचे प्रवेशपत्र व परिशिष्टे डाउनलोड करून पूर्ण भरावीत आणि मुलाखतीच्या दिवशी सोबत आणावीत.

पात्रता (Eligibility):
या प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे:
  1. CDSE (UPSC) किंवा NDA (UPSC) परीक्षा उत्तीर्ण व SSB मुलाखतीसाठी पात्र.
  2. NCC ‘C’ सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडसह, आणि SSB साठी शिफारस प्राप्त.
  3. Technical Graduate Course (TGC) साठी SSB मुलाखत पत्र.
  4. विद्यापीठ प्रवेश प्रणाली साठी SSB कॉल लेटर किंवा शिफारस यादीत नाव.

📞 अधिक माहिती साठी संपर्क:
  • ईमेल: training.petenashik@gmail.com
  • दूरध्वनी: 0253-2451032
  • व्हॉट्सअॅप: 9156073306 (कार्यालयीन वेळेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading