भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) तर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ITI शिकाऊ, पदवीधर शिकाऊ आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवाराच्या १९७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून चार वर्षांचे नियमित अभियांत्रिकी पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किवा एनसीव्हीटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २६ वर्षे असावे. तसेच, येथे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात विशेष सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया
गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल, यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
असा करा अर्ज
सर्व प्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. (https://www.aai.aero/) मुख्यपृष्ठावर AAI Apprentice Recruitment 2024 लिंकवर क्लिक करा. (https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/Advertisement%202024-2025.pdf) यानंतर तुमचे वयक्तीक तपशील भरून नोंदणी करा यानंतर तुमच्या मोबाईलवर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड येईल. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि अर्ज पूर्णपणे भरा. अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा यानंतर आवश्यक असलेले अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. अर्जाची प्रिन्ट काढून घ्या आणि तुमच्याकडे ठेवा
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.