भारतीय वायुसेनेत नोकरीची सुवर्णसंधी

Air Force
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
भारतीय वायू सेना यांच्या तर्फे कोणत्याही शाखेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ऑफिसर बनण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.   
 भारतीय वायू सेना – जानेवारी, २०२५ पासून सुरू होणाऱ्या कोर्सेसमधील प्रवेशाकरिता एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT-०१/२०२५/ NCC Special Entry) परीक्षा घेणार आहे.
(ए) AFCAT एन्ट्री – (१) फ्लाईंग ब्रँच – शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) – ३० पदे (पुरुष – २१ व महिला – ९).
पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी ५० टक्के गुण आवश्यक) आणि (i) पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (कोणतीही शाखा) किंवा (ii) B. E./ B. Tech. ६० टक्के गुण किंवा (iii) a. m. i. e. ६० टक्के गुण.
(२) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल ब्रँच) – (i) एअरोनॉटिकल इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स), AE(L), SSC – १२२ पदे (पुरुष – ९५ व महिला – २७).
पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इ.मधील इंजिनिअरींग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि (i) किंवा (ii) A. M. I. E. किंवा I. E. T. E. कडील G. M. E. ६० टक्के गुण.
(ii) एअरोनॉटिकल इंजिनिअर (मेकॅनिकल) AE (M), SSC – ६७ पदे (पुरुष – ५३ व महिलांसाठी – १४).
पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि मेकॅनिकल/ प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल/ एअरोस्पेस/ एअरोनॉटिकल/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल इ. विषयांतील इंजिनिअरींग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि/ किंवा A. M. I. E. ६० टक्के गुण.
(३) ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल ब्रँच) – (i) अॅडमिन – SSC – ५३ पदे (पुरुष – ४२ व महिला – ११). (ii) लॉजिस्टिक्स – SSC – १६ पदे (पुरुष – १३ व महिला – ३).
पात्रता : अॅडमिन व लॉजिस्टिक्स ब्रँचसाठी १२ वी आणि पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(iii) अकाऊंट्स – SSC – १३ पदे (पुरुष – ११ व महिला – २).
पात्रता : १२ वी आणि खालीलपैकी एक पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (बी.कॉम./बी.बी.ए./बी.एम.एस./बी.बी.एस./ बी.एस्सी.) (फिनान्स स्पेशलायझेशनसह)
(iv) एज्युकेशन – SSC – ९ पदे (पुरुष – ७ व महिला – २).
पात्रता : १२ वी आणि कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि पदवीला किमान ६० टक्के गुण आवश्यक.
(v) मेटीओरॉलॉजी एन्ट्री – SSC – ९ पदे (पुरुष – ७, महिला – २).
पात्रता : १२ वी आणि B. Sc. (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा B. E./ B. Tech. (कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/ मेकॅनिकल इ.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(vi) व्हेपन सिस्टीम (WS) – SSC – १७ पदे (पुरुष – १४, महिला – ३).
पात्रता : १२ वी (फिजिक्स, मॅथ्स विषयात) किमान ५० टक्के गुण आणि पदवी (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
ज्या उमेदवारांनी १० + २ पॅटर्नमधील १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, असेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) ब्रँचसाठीची १ जागा कायदा पदवीधरांसाठी राखीव आहे.
(सी) NCC स्पेशल एन्ट्री – फ्लाईंग ब्रँच – PC – (फक्त पुरुष) आणि SSC – (पुरुष/महिलांसाठी). CDSE मधील १० टक्के जागा PC साठी आणि AFCAT ब्रॅंचसाठीच्या जागांच्या १० टक्के जागा SSC साठी.
पात्रता : (अ) NCC एअर विंग सिनियर डिव्हीजन ‘सी’ सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. (ब) पदवीला (कोणत्याही शाखेतील) किमान ६०ङ्घ गुण आवश्यक. (क) १२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक.
पदवी परीक्षेतील CGPA ग्रेड टक्केवारीमध्ये रूपांतर (conversion) करण्याचा पुरावा सादर करणे आवश्यक.
(पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा ३१ मे २०२५ पर्यंत सादर करावा. त्यांना पदवी/पदव्युत्तर पदवीच्या अगोदरच्या सर्व सेमिस्टर्सना किमान सरासरी आवश्यक ६० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.
मॅरिटल स्टेटस – कोर्स सुरू होण्यापूर्वी उमेदवार अविवाहीत असणे आवश्यक आहे. ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये विवाह करण्यास परवानगी नाही.
वयोमर्यादा – (अ) फ्लाईंग ब्रँच AFCAT आणि NCC स्पेशल एन्ट्रीसाठी – (१ जानेवारी २०२६ रोजी) २० ते २४ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा.) DGCA कडील कमर्शियल पायलट लायसन्सधारक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – २६ वर्षे. (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्रातील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.)
(ब) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल/नॉन-टेक्निकल) ब्रँचेस – (दि. १ जानेवारी २०२६ रोजी) २० ते २६ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००० ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा.)
शारीरिक मापदंड – उंची (पुरुष व महिला) फ्लाईंग ब्रँच – १६२.५ सें.मी., ग्राऊंड ड्युटी ब्रँचेस – (पुरुष) १५७.५ सें.मी.; महिला – १५२ सें.मी.
छाती – किमान ५ सें.मी. छाती फुगविता येणे आवश्यक. (७७८२ सें.मी.)
वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात वजन असावे. (अपेंडिक्स-बी प्रमाणे)
वैद्याकीय तपासणी – सर्व अंगांनी सखोल केली जाते. मेडिकल स्टँडर्ड्स AFCAT च्या वेबसाईवरील जाहिरातीत Appendix- A मध्ये उपलब्ध आहेत.
वेतन : कमिशनिंगनंतर फ्लाईंग ऑफिसर रँकवर डिफेन्स पे-मॅट्रिक्स लेव्हल-१० (रु. ५६,१०० – १,७७,५००) अधिक मिलिटरी सर्व्हिस पे रु. १५,५००/- अधिक इतर भत्ते.
रजा : वार्षिक ६० दिवस आणि २० दिवस नैमित्तिक रजा. ऑफिसर्सचा १.२५ कोटी रुपयांचा विमा उतरविला जाईल.
शंका समाधानासाठी संपर्क : ऑनलाइन परीक्षा, रजिस्ट्रेशन, अॅडमिट कार्ड संबंधी ०२०-२५५०३१०५/६. ई-मेल आयडी – afcatcell@cdac.in. इतर चौकशीसाठी ०११-२३०१०२३१, विस्तार क्र. ७६१०, टोल फ्री नंबर १८००-११-२४४८.
AFCAT एन्ट्री परीक्षा शुल्क – रु. ५५०/- जीएस्टी. (NCC स्पेशल एन्ट्रीसाठी परीक्षा शुल्क लागू नाही.) https://careerindianairforce.cdac.in किंवा https://afcat.cdac.in या संकेतस्थळावर वेगवेगळ्या टॅबमधून Afcat Entry/ NCC Entry साठी ऑनलाइन अर्ज ३१ डिसेंबर २०२४ (२३.३० वाजे)पर्यंत करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading