जगभरात दुचाकी वाहन निर्मितीत प्रसिद्ध असलेल्या जपानमधील होंडा मोटर्स कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने २०२८ पर्यंत भारतात एक स्वतंत्र इलेक्ट्रिक बाईक फॅक्टरी उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.
नरसापुरा फॅक्टरीपेक्षा वेगळी असणार नवीन फॅक्टरी होंडाची ही नवीन फॅक्टरी बंगळुरूजवळील नरसापुरा फॅक्टरीपेक्षा स्वतंत्र आणि वेगळी असणार आहे. या फॅक्टरीत भारतातील बाजारपेठेसाठी तसेच निर्यातीसाठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स तयार केले जातील. मोटरसायकल आणि पॉवर इलेक्ट्रिफिकेशन बिझनेस युनिटचे प्रमुख डाइकी मिहारा यांनी याबाबत माहिती दिली.
इलेक्ट्रिक बाईकची विशेष वैशिष्ट्ये होंडा १ हजार सीसी क्षमता असलेल्या इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती या फॅक्टरीत करणार आहे. या बाईक्समध्ये ४ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी असतील. वेगवेगळ्या मॉडेल्ससह फिक्स्ड बॅटरी असलेले पर्यायही सादर केले जातील.
२०३० पर्यंत ३० मॉडेल्सची निर्मिती आणि मोठी विक्री होंडा कंपनीने २०३० पर्यंत जागतिक स्तरावर ३० इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. तसंच, वार्षिक ४० लाख वाहनांच्या विक्रीचा कंपनीचा मानस आहे. होंडाच्या गाड्यांना याआधीच मोठी मागणी असल्याने कंपनीला या नव्या क्षेत्रातही यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात होंडाची उशिरा पण दमदार एन्ट्री इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात होंडा उशिरा प्रवेश करत असली तरी ती पूर्ण तयारीनिशी उतरली आहे. भारतीय बाजारपेठेत होंडाची इलेक्ट्रिक बाईक आल्यानंतर ती पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास कंपनीच्या वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
होंडा मोटर्स भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीची ही नवीन फॅक्टरी देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादनाला नवी दिशा देईल आणि बाजारात मोठे यश मिळवेल, अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.