भाजपा सत्तेत आल्यास चोर पावलांनी हुकुमशाही येईल : मा. केंद्रीयमंत्री अनंत गीते

Anant Gite Naothane
नागोठणे ( महेंद्र माने ) :
रायगड लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडी उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची नागोठणे येथे गुरुवार 04 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या जन संवाद प्रचार सभेत भाजपा सत्तेत आल्यास चोर पावलांनी हुकुमशाही येईल असे प्रतिपादन अनंत गीते यांनी केले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख विष्णु पाटील, सहसंपर्क प्रमुख तथा इंडिया आघाडी नेते किशोर जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सरपंच सुप्रिया महाडीक,राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (शरद पवार गट)अनिल तटकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदाताई म्हात्रे,सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन,शेकाप नेते शंकरराव म्हसकर, शिवसेना उपजिल्हा संघटिका दर्शना जवके,युवासेना म.रा.जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे,जिल्हा युवती अधिकारी धनवंती दाभाडे,तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्यासह दिनेश चिले,संजय भोसले,बिलाल कुरेशी,संजय महाडीक,डॉ.मिलिंद धात्रक,अजगर मुल्ला,अशपाक पानसरे,कीर्तीकुमार कळस,धनंजय जगताप,वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे,वांगणी सरपंच सोनम भोसले,उपसरपंच अखलाक पानसरे,डॉ.हाफिज,मोहन नागोठणेकर,मजित लंबाते, संजय काकडे,बाळु रटाटे,जौरुदिन सय्यद,प्रणिता पत्की तसेच इंडिया आघाडीचे प्रमुख नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांजवळ जनसंवाद साधताना अनंत गीते यांनी सांगितले की, या सभेत मुस्लिम बांधवांनी आपला रोजा येथेच खजूर खाऊन सोडला व त्यांनी 07 मे च्या विजयाचा खजूर मला दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत आहे. आज साधू संतांचा, सुंसस्कृत समजणारा महाराष्ट्राचे राजकारण नीच व गलिच्छ झालेला असून या राज्यात एका बकासुराचा अंश आहे.त्याची भूक काही केल्या थांबत नाही. शिवसेना फोडून सरकार बनले असतानाही भूक थांबली नाही म्हणून राष्ट्रवादी,कॉग्रेस फोडली. ही भूक थांबण्यासाठी भीमाच्या रूपाने जनताच निवडणुकीत बकासुराचा वध करणार आहे.केव्हडी ही सत्तेची लालसा मग एक हाती सत्ता आली तर देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही चोर पावलांनी हुकुमशाही येईल.ती रोखणे व संविधान वाचविणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगून निवडणुकीची मला चिंता नाही स्वच्छ चरित्र हेच माझे भांडवल असून माझ्याबरोबर बहुजन,मुस्लिम,आदिवासी व दलित समाजासह इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष बरोबर असल्याचे गीते यांनी शेवटी सांगितले. अनिल तटकरे यांनी उद्याची निवडणूक शेवटची होऊ नये यासाठी संविधान वाचविणे गरजे आहे. त्यासाठी कोणताही डाग न लागलेले अनंत गीते यांना सुज्ञ जनता दिल्लीला पाठविणार असून रायगड मतदार संघातून त्यांना मताधिक्य मिळणार असल्याचे सांगितले.
गांधी चौक विजयाचा चौक – किशोर जैन यांनी येथील गांधी चौक हा विजयाचा चौक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या विरोधात खासदार,मंत्री,आमदार,माजी आमदार,दादा,शेठ उतरले असतानाही त्यांना आम्ही भुईसपाट करुन या चौकातूनच विजय मिळविला असल्याने गीते यांच्या विजयाचाही या ठिकाणी शिक्का मोर्तब झाला आहे. येथील आदिवासी बांधवांसह सर्व समाज बांधवांचे आपल्यावर विश्वास व प्रेम असल्याने आपण कोणतीही काळजी करू नका असे सांगून या विभागातून 2000 ते 2500 मतांचे लीड घेणार असल्याचा विश्वास जैन यांनी शेवटी व्यक्त केला.
नंदाताई म्हात्रे यांनी देशाचे संविधान टिकले पाहिजे. तसेच आपली निशाणी मशाल ही दैवी व्यवस्था असून तिला रायगडची जनता हातात घेऊन उजाळा देणार असल्याने आपल्याला गीतेंसारखे अनुभवी नेते दिल्लीला पाठवायचे असल्याचे सांगितले. शंकरराव म्हसकर यांनी ही निवडणूक ऐतिहासिक असून सहा वेळा निवडून गेलेले स्वच्छ चरित्र व जमिनीवर पाय असलेले अनंत गीते हे इंडिया आघाडीच्या मताधिक्यावर दिल्लीला जाणार असून ते मंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. उल्का महाजन यांनी ही निवडणूक संविधनावर होत असून ती व लोकशाही वाचविणे गरजेचे असून ही लढाई भारतीय जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी होणार असल्याचे सांगितले. सदरील सभा यशस्वी होण्यासाठी शाखाप्रमुख धनंजय जगताप,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे,सचिन ठोंबरे व प्रकाश कांबळे यांच्यासह राजू पितानी,आसिफ मुल्ला,इम्रान पानसरे,प्रणव रावकर,सोहेल पानसरे,समीर भिकन,शेखर जोगत,सतीश पाटील,अमोघ विळेकर,जिशान सय्यद, हुसेन पठाण तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अपार मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading