
वेळास आगर ( संतोष शिलकर ) :
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास ग्राम पंचायतीचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पक्षाचे श्रीवर्धन तालुका सरचिटणीस अशितोश पाटील यांची भाजपा च्या श्रीवर्धन तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजकारण आणि समाज कार्याची आवड असणाऱ्या तरुणांच्या पैकी एक अगदी लहान वयात वेळास ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी विराजमान होऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध विकास कामं केली. तसेच सरकारच्या समाज्योपयोगी योजना घरा घरात लाभार्थ्यांन पर्यंत पोहचविण्यात त्यांनी मेहनत घेतली. काही ना काही विकास व्हावा. या करीता धडपड करणारा कार्यकर्ता. ग्रामस्थांना ब्लँकेट वाटप, छत्री वाटप, महिलांना साडी वाटप, मिठाई वाटप, मुलांच्या स्पर्धा आयोजित करणे अशा विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेऊन तरुणांना प्रोत्साहित केले होते.
कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आवडीने काम करणारा कार्यकर्ता सन २०२० साली देशातच नव्हे तर जगात कोरोना सारख्या महामारीत सुध्दा त्यांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. त्या नंतर आलेला निसर्ग वादळात संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. राज्य सरकारच्या वतीने आलेल्या नुकसान भरपाईचा लाभ प्रत्येकाला मिळावा या साठी सरकारी यंत्रणेला त्यांनी केलेले सहकार्य,सरपंच म्हणून केलेलं काम कौतुकास्पद आहे.अशा कर्तव्यदक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पक्षाने दखल घेतली आहे.
तीन महिन्या अगोदर भाजपा श्रीवर्धन तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून आशुतोष पाटील यांची निवड करण्यात आली होती. प्रभारी पद स्वीकारल्या नंतर त्यांनी केलेल्या पक्ष बांधणीचे कार्य पाहता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने आणि भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वा खाली व श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांची तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
लहान वयात राजकीय जीवनात मोठ मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळून पक्षातील वरिष्ठांची मर्जी संपादन करून त्यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली असल्याचे समजते. त्यामुळे त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.