पोलादपूर ( शैलेश पालकर ) : तालुक्यातील कोतवाल-कोंढवी येथील दरेकर भावकी आणि समाजबांधवांच्या ऐक्यातून तालुक्यात पुष्कळ चांगले वातावरण सामाजिक व राजकीयदृष्टया दिसून येईल. विकासकामांद्वारे येथील जनतेच्या गैरसोयी दूर करण्यासाठी आपला आमदार निधीदेखील आपण सढळहस्ते देऊ. मात्र, कोंढवीतून जि.प.-पं.स.निवडणुकांवेळी भाजपला साथ द्या, असे आवाहन विधानपरिषदेचे सदस्य आ.प्रवीण दरेकर यांनी केले.
कोंढवी तळयाचीवाडी येथे श्रीदेव भैरवनाथ रवळनाथ मंदिर दरेकर व समस्त मंडळी कोंढवी भव्य उदघाटन सोहळा व कलशारोहण कार्यक्रमाप्रसंगी आ.प्रवीण दरेकर यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. याप्रसंगी आ.दरेकर यांच्यासोबत बिपिन म्हामुणकर, तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, महेश निकम, प्रतिक सुर्वे, नितिन बोरकर, समिर सुतार, कार्यक्रम संयोजक साहेबराव दरेकर, महेश मोरे, प्रदीप सुर्वे, भारत मोरे उपस्थित होते.
जिल्हा बँकेसारख्या 12-13 हजार कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी संदीप सुर्वे उपस्थित असताना समाजाला हे नक्कीच अभिमानास्पद आहे. या विभागाच्या विकासासाठी राज्यसरकार तसेच जिल्हा नियोजन मंडळासह आपल्या आमदार निधीतूनही तरतूद करू. सर्वांनाच श्रीदेव भैरवनाथ व रवळनाथांच्या आशीर्वादाने दीर्घ आयुष्य व आरोग्य मिळेल, असा विश्वासही यावेळी आ.दरेकर यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षातर्फे तळयाचीवाडीतील सभामंडपासाठी 10 लक्ष रूपये, कोंढवी तळयाचीवाडी ते आदिवासीवाडी रस्त्यासाठी 10लक्ष रूपये तसेच प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी 5 लक्ष रूपये आ.प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाले असल्याची माहिती यावेळी तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
स्नेहल जगताप व अमित मोरे यांची तळयाची वाडी येथे सदिच्छा भेट
याप्रसंगी महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा तथा महाड विधानसभा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल माणिकराव जगताप तसेच महाड विधानसभा संपर्क प्रमुख अमित प्रभाकर मोरे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी नगरसेवक प्रमोद सावंत, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, मुंबईच्या माजी नगरसेविका सुप्रिया सावंत, नगरसेवक दिलीप भागवत, माजी उपसभापती शैलेश सलागरे, तालुका प्रमुख अनिल मालुसरे, जेष्ठ शिवसैनिक संभाजीदादा साळुंखे, जेष्ठ नेते बाळाराम मोरे, शेकाप तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, उपसभापती कृऊबा समिती वैभव चांदे, अमोल भुवड, महेश दरेकर, पोलादपूर शहर प्रमुख निलेश सुतार, साई शिंदे, नामदेव शिंदे, तालुका युवासेना प्रमुख निशांत शिंदे, श्रीकांत भिलारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.