अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्ह्यातील माणगाव उपविभागात गेल्या दोन दिवसांत अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. आधीच्या दोन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज तळा तालुक्यातील तारणे गावाजवळ एक भीषण अपघात घडला.
आज दुपारी साडे बाराच्या सुमारास तळा तालुक्यातील राहटाड येथून तळा दिशेने येणारी एस.टी. बस (MH20BL3914) ही तारने गावाजवळील उतारावर होती. त्याचवेळी आगरदांडा दिशेने भरधाव वेगात येणारा 10 चाकी ट्रेलर (NL01AF9849) चालक दीनदयाल रामकरण पाल (वय 21, बिहार) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. डंपरने बसला जोरदार धडक दिली व बस उजव्या बाजूने फाडून पुढे जाऊन पलटी झाला.
या भीषण अपघातात तृप्ती विजय कुटेकर (22), लक्ष्मण राया ढेबे (35), अन्वी रुपेश गमरे (7), विठ्ठल कजबजे (55) यांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत झालेल्यांमध्ये एका सात वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.
🩺 गंभीर जखमींची यादी:
-
लखमू पांडुरंग मुकणे (70)
-
काजल समीर जाधव (40)
-
नामदेव नागे
-
सुनील समीर जाधव (10)
-
मोरेश्वर देवे (19)
-
अनु बरवत (40)
-
विजय शिंदे (28)
-
काशिनाथ ढेबे (52)
-
सविता शांताराम गायकवाड (45)
-
यशवंत नारायण रामाने (77)
-
लक्ष्मण नाग्या गमरे (60)
-
वैष्णवी विजय कुटेकर (25)
-
सखुबाई तुकाराम गायकवाड (70)
-
जयश्री नामदेव गवाणे (60)
-
संगीता अंकुश जाधव (40)