भजन स्पर्धेत कोतवालचे राधा कृष्ण भजन मंडळ डोंबिवली प्रथम

Poladpur Bhajan Mandal

पोलादपूर ( शैलेश पालकर ) :

डोंबिवली येथील अभंग फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोलादपूर तालुकास्तरीय वारकरी भजन स्पर्धा 2024 चे आयोजन विक्रोळी पश्चिम मुंबई येथे श्री स्वयंभू हनुमान मंदिर करण्यात आले असता कोतवालचे राधा कृष्ण भजन मंडळ डोंबिवली प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये पोलादपूर तालुक्यातील नामांकित 10 भजनी मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामुळे तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील असंख्य भक्तगण यावेळी उपस्थित राहिले.
 कार्यक्रमाची सुरूवात श्रीसरस्वती माता पूजन, श्रीविठ्ठल रुक्मिणी भगवान पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा श्रीशिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून झाली. सकाळी 10 ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत भक्तिमय वातावरणात कार्यक्रम राहिला. कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षक महाराष्ट्रातील नामांकित गायनचार्य ह.भ.प नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, पखवाज विशारद ह.भ.प.निळोबाराय गोठणकर व समन्वयक म्हणून मुख्य भूमिका बजावली ते पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र कोकणरत्न ह.भ.प.अंकुश महाराज कुमठेकर गायनाचार्य, मृदुंगचार्य घाटकोपर अभंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.सोपानदादा मोरे यांनी भव्य दिव्य असे वारकरी संप्रदायिक भजन स्पर्धेचे आयोजन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश केसरकर यांनी केली. प्रास्ताविक भाषण ह.भ.प.उत्तम जाधव यांनी केले.
पोलादपूर तालुक्यातील राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंतांची मांदियाळी यावेळी अवतरली. कीर्तनकार, प्रवचनकार, गायनचार्य, मृदुंगचार्य व ज्येष्ठ नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली. बक्षीस वितरण श्रीसंत मोरे माऊली संप्रदायाचे अधिष्ठानपती सद्गुरु श्री.दादामहाराज मोरे माऊली यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रथम क्रमांकाचे मानकरी पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गावातील राधा कृष्ण भजन मंडळ डोंबिवली हे मंडळ ठरले.
यावेळी द्वितीय क्रमांक पोलादपूर तालुक्यातील बोरज येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ घाटकोपरला मिळाला. तृतीय क्रमांक पोलादपूर तालुक्यातील खोपड गावातील श्रीजननी कुंबळजाय भजन मंडळ घाटकोपरला देण्यात आला. उत्तेजनार्थ क्रमांक पोलादपूर तालुक्यातील काटेतळी येथील महाकाली भजन मंडळ अंबरनाथला देण्यात आला. ताल संचसाठी अंबरनाथस्थित पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामस्थ मंडळ, उत्कृष्ट गायक म्हणून श्रीराम भजन मंडळ काटेतळी आणि ह.भ.प.किरण महाराज मोरे, उत्कृष्ट वादक सडे येथील कांगोरीगड भजन मंडळ आणि ह.भ.प. धीरज शिंदे  तर आयोजक सोपानदादा मोरे व अभंग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading