रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या तसेच निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या बाळसई गावाची ग्रामदेवता श्री.बेलजाई मातेचे मंदिर प्रसिद्ध असुन ते जागृत देवस्थान आहे. विशेष म्हणजे चैत्र शुद्ध पंचमीला श्री.बेलजाई मातेच्या पालखी सोहोळ्याचा उत्सव हा अतिशय उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. यावेळी रोहा , सुधागड , पेण , माणगाव तालुक्यांसह नागोठणे परिसरातील अनेक भक्तगण या उत्सवासाठी आवर्जून येत असतात.
श्री.आई बेलजाई मातेच्या मंदिरात दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात व मोठ्या श्रद्धा भक्तिने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असल्यामुळे अनेक भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीसमोर आपले गा-हाणे मांडुन खणा- नारळाने देवीची ओटी भरतात. श्री.बेलजाई मातेच्या मंदिराच्या सभोवताली डोंगराळ जंगली भाग असुन बाजुलाच शंकराचे मंदिर देखिल आहे. तर मंदिराच्या एका बाजूने शुभ्र व सुंदर असा पाण्याचा वाहत असलेला छोटा नाळा सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
संपूर्णतः सुख- समृद्धीने नटलेले गाव म्हणजे बाळसई. ७०० ते ८०० लोकवस्ती असलेल्या बाळसई गावाच्या पुर्वेस डोंगराच्या बाजुलाच देवीचे मंदिर आहे. सुरुवातीला हे छोटेसे कौलारू मंदिर होते. कालांतराने श्री. बेलजाई मातेच्या कृपेने व बाळसई ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंदिराचा जिर्णोद्धार करुन सुंदर असे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी गावचे भोपी विठोबा मुंडे हे पुजा करीत असतात. सद्यस्थितीत बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे देवी व तिचे उत्सव कार्य पार पडत आहेत. मंदिरात अनेक वेळा होम- पुजन , हवन व ईतर अध्यात्मिक आणी सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी मोठ्या उत्साहाने पार पडतात.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.