अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील भाकरवड गावच्या बी के एम क्रीडा मंडळ संघास श्री भालचंद्र पाटील यांनी होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देत आपल्या मातोश्री स्व बाबीबाई मारूती पाटील यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक 30 नोहेंबर 2024 रोजी गणवेश / कबड्डी किट वाटप करण्यात आला.
भालचंद्र पाटील हे भाकरवड गावचे सक्रिय सभासद तसेच हौशी कलाकार आहेत एक सामाजिक बांधिलकी जपत गावातील हर एक सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक , क्रीडा, आदी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात कुमार गटाचे कबड्डी सामने घोषित झाले असून रायगड जिल्ह्यातील अनेक संघ या मध्ये सहभाग घेणार आहेत याच अनुषंगाने आपल्या गावातील खेळाडूंना गणवेश देण्याचे ठरविले यावेळी बी के एम क्रीडा मंडळ ग्राऊंडवर वाटप करताना नविन पाटील , सुयोग पाटील, नितीन पाटील ,तुकाराम पाटील, दक्ष पाटील, निलेश पाटील, शुभम पाटील, विशाल पाटील, अनुज पाटील ,अलंकार पाटील ,तन्मय धुमाळ ,मानस पाटील, आदी खेळाडू उपस्थित होते .
यावेळी भालचंद्र पाटील यांचा सत्कार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटील, उपाध्यक्ष उत्तम पाटील आदींनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले आपल्या मनोगतात पाटील यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देत भविष्यात चांगले करिअर करून कब्बडी हा रानग्या मातीतला खेळ आहे तो तुमचे भविष्य बदलू शकते तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती नीसंकोच पणे सदल हस्ते करण्याचे यावेळी आश्वासन दिले .
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.