रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधम याच्याकडून सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचेही उघड झालंय. नराधमांनीच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले असल्याने मुरुडसह अलिबाग तालुका हादरलं आहे.
आरोपी हा फरार झाला असून पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच पथक नेमले असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ असलेल्या समुद्रकिनारी नेवून तिच्यावर शाररिक अत्याचार केला आहे. याबाबत ची फिर्याद पीडित मुलीच्या आईनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड तालुक्यातील एका गावात दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सात वर्षीय पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती. सदर ठिकाणी आरोपी याने येवून पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे अज्ञान असण्याचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या केलेल्या एका बोटीत नेऊनतिच्यावर शारीरीक अत्याचार केला. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री अकरा वाजून 32 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत नराधमाने समुद्र किनारी असलेल्या एका होडीत. नेऊन तिने तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने याबाबत कोणालाही काही सांगू नये तसेच घरी जावून होडीचा गळ गुप्तांगला लागला आहे असे सांगण्यास भाग पाडले व तिच्या हातावर मारहाण देखील केली आहे.
याबाबत अधिक तपास मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस उप निरीक्षक एम टी शिंदे या करीत आहेत. बावीस वर्षीय नराधम यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होर धरत आहे. ही घटना अत्यंत नीच वृत्तीची आहे.
काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये देखील अल्प वयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता. अशा घटनेतील आरोपी यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला जलदगतीने न्यायलायत चालविण्याची मागणी सामजिक कार्यकर्ती रुपाली पेरेकर यांनी केली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून सदर पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे. तसेच तिला पोलिस विभागाकडून सर्वतोपरी न्याय मिळणार असल्याची ग्वाही रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अभितजित शिवथरे यांनी PEN न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.व कलम1कॉ.गु.रजि.नं.१७२/२०२४ भारतीय न्याय. संहीता २०२३ चे कलम ६५ (२),६४ (एल) सह लैंगिक १७२/२०२४ भारतीय न्याय. संहीता २०२३ चे कलम अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ३ (बी), ४(२), ५ (एम), ६(१), ७,८, ९ (एच), ९ (एम), १०,१२ दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.