सुकेळी (दिनेश ठमके) : कोकणवासीयांचा महत्वाचा असा सण मानला जाणारा होळीचा सण रोहा तालुक्यासह नागोठणे परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. बाळसई गावामध्ये देखिल रवि. दि .२४ मार्च. २०२४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ मंडळ व चाकरमानी यांच्या उपस्थितीत होळी पेटऊन होळी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
रवि. दि. २४ रोजी बाळसई गावामध्ये सायंकाळी होळी रचण्यात आली. त्यानंतर गावातील महिलांनी होळीका मातेचे पुजन करण्यात आले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास होळीच्या सभोवताली ढोल – ताशाच्या गजरात पारंपारिक गाणी बोलत गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण वर्ग नाचण्याचा आनंद लुटत होळीच्या सभोवताली पाच फे-या पुर्ण झाल्यानंतर होळी पेटवण्यात आली. यावेळी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली हा होळी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच सोम.दि २५ रोजी गावातील सर्वच तरुण वर्गांनी रंगाची उधळण करत तसेच ढोल – ताशांच्या गजरात होळी महोत्सव व रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला.