PEN न्यूज ऑनलाइन टीम :
मुंबई क्राईम ब्रँचने अकोल्यातील बाळापूर येथून सलमानभाई इक्बालभाई वोहरा याला अटक केली.
१२ ऑक्टोबरला वांद्रे पूर्व निर्मल नगर येथे झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. वोहराने गुन्ह्यातील आरोपींना आर्थिक मदत केली होती.
वोहराने यावर्षी मे महिन्यात एक बँक खातं सुरू केलं होतं आणि अटक करण्यात आलेले आरोपी गुरमेल सिंह, रुपेश मोहोळ आणि हरिशकुमारचा भाऊ नरेशकुमार सिंह यांना आर्थिक मदत केली होती. अशी माहिती प्राप्त झाली आहे.
आतापर्यंत मुख्य शूटरसह २५ जणांना अटक झाली आहे. क्राईम ब्रँचच्या तपासानुसार, लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला होता.
ती.