बाथरुमला जावून येत्तो असे सांगून गेलेला वृद्ध इसम बेपत्ता !

Sawant
पनवेल :
नातेवाईकांसोबत बेलापूर ते पनवेल असा प्रवास करून पनवेल स्थानकात फलाट क्र. ०६ वर बाकड्‌यावर बसवले असता. सदर वृद्ध इसमाने बाथरुमला जावून येत्तो असे सांगून गेला तो अद्याप परत न आल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
सदर इसमाचे नाव मारुती लक्ष्मण सावंत ( वय-७५ वर्षे, रा. आंबेवाडी ता. रोहा) असून त्याची उची ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा-उभा, नाक-सरळ, डोळे- काळे, केस-काळे बारीक, अगांत, पांढऱ्या रंगाचा चौकडीचा फुल बाह्यांचा शर्ट व ग्रे रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल रेल्वे पोलस ठाणे २७४६७१२२ किंवा मपोह वा बोराटे यांच्याशी ९८२१४२५४०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading