कर्जत/कशेळे ( मोतीराम पादीर ) :
महाराष्ट्रात काही दिवसात सर्वत्र गणेश चतुर्थीच्या दिवशी आराध्य दैवत गणरायाचे आगमन होणार आहे. आपल्या लाडक्या बापाचे घरगुती सजावट मध्ये विराजमान करण्यासाठी सुंदर अशा बांबू पासून तयार केलेल्या मखारी बाजारात पाहायला मिळत आहेत. सुंदर आणि मनमोहक अशा मखारी मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. बांबू पासून बनविलेल्या विविध मखर एक वेगळा आकर्षण असून ते बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.अशा बांबू पासून बनविलेल्या मखर विक्रीसाठी ठेवलेल्या पाहायला मिळत आहे.बांबू पासून बनवलेल्या मखर या पर्यावरण पूरक असल्याने ग्राहकांनी बांबूपासून बनवलेल्या मखराला पसंती दिली जात आहे.
कर्जत तालुक्यातील कशेळे बाजारपेठ तसेच कर्जत बाजारपेठ मध्ये अनेक ठिकाणी बांबू पासून बनविलेल्या मखर पाहायला मिळत आहेत. कर्जत तालुक्यातील कशेळे येथील मखर बनविण्याचा व्यवसाय करणारे रोहीदास शेळके हे गेली सात वर्षापासून मखर बनविण्याचे काम करीत असून ते या व्यवसायात आपला तग टिकून आहेत. छोट्या तसेच मोठ्या आकाराच्या मखर ते बनवितात तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या आकारात मखर बनवून दिली जाते. गणेशउत्सव सुरु होण्याआधी आठ महिन्या पासून बांबूचे मखर तयारी केली जाते.
यासाठी लागणारे बांबू आदिवासी भागातून तसेच मुंबई मार्केट मधून उपलब्ध होत असतात.बांबू पासून मखर बनवायला खुप मेहनत घ्यावी लागत असल्याचे रोहिदास शेळके सांगतात. दिवस भरात एक किंवा दोन मखर बनवल्या जातात. साधारण ५०० ते १००० रुपये या किंमती पासून १२०००/ रुपया पर्यंत मखारी उपलब्ध आहेत. या सर्व कामासाठी कुटुंबातील सदस्य मला मदत करीत असल्याचे शेळके सांगतात. २०१७ पासून थरमाकोल वर बंदी आल्यापासून बांबूच्या मखरीला मोठी मागणी वाढली आहे.तसेच या मखारी पर्यावरण पूरक असल्याने त्याचा पर्यावरणाचा कोणता ह्रास होत नाही.
——————————————–
गणपतीच्या सिजन मध्ये साधारण २५०ते ३०० मखारी विक्री करतो. मखार बनवायला ७/८ कारागीर लागतात बांबूच्या मखरीला ग्रामीण तसेच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
…रोहिदास शेळके, मखर विक्रेते, कशेळे-कर्जत