महाड तालुक्यातील गोंडाळे येथील वाडीवर बंधाऱ्याचे काम सुरू असताना काँक्रीट चा मिक्सर अंगावर पडून अपघात झाला या अपघातामध्ये एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झाला आहे.
महाड तालुक्यातील बोंड आळी देऊळकोंड येथे जलसंधारण विभागाचे बंधाऱ्याचे काम सुरू असताना आज दुपारी काँक्रीट मिक्सर पलटून झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. मैनूद्दिन अन्सारी वय १९ रा. मध्य प्रदेश, असे मयताचे नाव असून सुमित धाणे हा या अपघातात जखमी झाला आहे. घटनास्थळी महाड पोलीस दाखल झाले असून याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
या अपघातानंतर तालुक्यात सुरू असलेल्या विविध शासकीय बांधकामांवरील तसेच खाजगी बांधकामांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांवर कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते हे यातून उघड झाले आहे.. अनेक ठिकाणी चालू असलेल्या विकास कामांवर मोठ्या प्रमाणावर बालकामगार देखील काम करीत आहेत.
मात्र ज्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ही कामे चालू आहेत त्या कामाचे अधिकारी संबंधित कामांवर कधीच जात नसल्याने तसेच शाखा अभियंता देखील प्रत्यक्ष कामावर हजर राहत नसल्याने मोठ्या प्रमाणावर बालकामगार व महिला कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.